डासांची घनता कमी करण्यासाठी चित्रनगरीच्या माळावरील टायरी हटवाव्यात

दीपक देवलापूरकर
मंगळवार, 19 जून 2018

डासांची घनता कमी करण्यासाठी सामान्यतः नागरिकांच्या घागरी रिकामी करायच्या. अर्थात् ते बरोबरही आहे. पण दुसऱ्या बाजूला कोल्हापूर चित्रनगरीच्या माळावर गेली अनेक वर्षे हजारो टायरी उघड्यावर पडलेल्या आहेत. नागरिकांचा जीव धोक्यात आणणाऱ्या या टायरींचा बंदोबस्त करणे प्रशासनाला अद्याप शक्य का झाले नाही?

डेंगी, मलेरिया या रोगांपासून संरक्षणासाठी डासांची पैदास होऊ नये यासाठी शासनपातळीवर काळजी घेण्यात येते. पण टायर, नारळाच्या करवंट्या आदीमध्ये पाणी साठून पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होते. कोल्हापूर चित्रनगरीच्या परिसरात अनेक वर्षापासून टायरी उघड्यावर पडलेल्या आहेत. या भागात डासांचे प्रमाणही अधिक आहे. सध्या डेंगीची साथ विचारात घेता प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे. 

Web Title: Esakal Citizen Journalism Deepak Devalapurkar letter