संगीतातला एकलव्य...

गोविंद के. पाटील
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर जिल्ह्यातील निढोरी (ता. कागल) येथील शिवाजी कोळी. परिस्थितीमुळे 30 वर्षांपूर्वी अक्षरशः मटका घेणारा तरूण. त्यांच्या गावाहून सहा मैलावर असलेल्या कूर गावी सकाळी सकाळी यायचा.. फावल्या वेळात स्टॅडजवळच्या यशवंत (सुतार)पेंटरच्या फोटो स्टुडिओत बसायचा..पेंटर हरहुन्नरी.. चित्रे करायचा.. फोटो काढायचा.. घड्याळे आणि हार्मोनियम दुरूस्त करायचा...हातात जादू असलेला कसबी म्हणजे पेंटर..मूड असेल तेव्हा हार्मोनियमवर बोटं चालवायचा..त्याच्या बोटातून पाझरणाऱ्या जुन्या गाण्यांच्या सुरावटीत ऐकणारा हरवून जाणार... शिवाजीही त्याला अपवाद नव्हता.

लोकांच्या नजरेत वाया गेलेला तरूण ..पोटासाठी मटक्याच्या चिठ्ठ्या लिहिणारा शिवाजी कोळी सुरांच्या प्रेमात पडला..नादी लागला. लग्न झालेलं...तीन मुलांचा बाप..आईवडिलांसह कुटूंब-कबिला चालवण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता...पण हे सगळं करत असताना त्यांने हळूहळू पेटीवर बोटे चालवायला सुरुवात केली आणि एखादी सिद्धी हात जोडून समोर उभी रहावी तसे गळ्यातले सूर हार्मोनियम मधून बाहेर पडायला लागले...अभंग, गौळणी, भारूड, भावगीते गात गात तो उत्कृष्ट हार्मोनियम वाजवायला शिकला. 

दरम्यान मुले शिकली..थोरला सैन्यात भरती झाला..बापाने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून घर सुधारणेला हातभार लावत राहिला. बापासाठी मागेल ती हार्मोनियम घेऊन दिली. पण आश्चर्य हे की कोणत्याही गुरूच्या मार्गदर्शना शिवाय केवळ निरिक्षण आणि सराव यांच्या जोरावर एकलव्याच्या निष्ठेने शिवाजी संगीत शिकला. सुरवातीला कूर गावी यशवंत पेंटर यांच्या स्टुडिओतले दिवस आठवून त्यांनाच तो आपला गुरु मानतो. आज निढोरी पंचक्रोशीतील काही मुले त्याच्या साथीला येतात. शिवाजी कोळी नावाच्या या एकलव्यालाच आपला गुरु मानतात. काही अभंग, गौळणी आणि संत कबीर यांच्या भैय्या गाडीवाला अशा रचना त्यांच्या आवाजात ऐकणं हा आनंदानुभव आहे आणि तो मी कितीतरी वेळा घेतला आहे.

Web Title: Esakal Citizen Journalism Govind Patil article