कवितेत रमलेला कवी

गोविंद पाटील
गुरुवार, 10 मे 2018

शालेय जीवनातच मनातील अस्वस्थता, सामाजिक प्रश्न, समस्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुनील पाटील मांडू लागले. 2000 सालापासून विविधांगी लेखन प्रवासाला सुरवात झाली. सुरवातीला बालकविता, बालकथा, प्रासंगिक, ललित आदींचे लेखन सुनील यांनी  केले आणि ते वर्तमापत्रामधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. पण सगळीच सोंग त्याच ताकदीने वटवता येणार नाहीत याची जाणीव झाल्यामुळे आता फक्त "कविते" तून व्यक्त होताहेत. त्यावरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

गावच्या माणसांच्या जगण्याचा खटाटोप, परिस्थिती पुढची हतबलता मात्र खुप खोल त्यांच्या कवितेत रुजतेय. नात्यातला दुरावा, माणसांचा भणंगलेपणा, कुणब्याच्या मातीची व्यथा, अविश्वास, हरवलेली माणुसकता बघुन त्यांची कविता आक्रोश करते. माणसाच्या मनाचे नितळपण, काळीजमाया शोधण्याचा प्रयत्नही त्यांची कविता सदैव करते. नफ्या तोट्याची गणिते त्यांच्या कवितेने कधी मांडली नाहीत. मात्र  कवितेने त्यांना मानसन्मान आणि आत्मिक समाधान भरभरुन दिलय. समाज आणि समाजातील वेदना मांडताना  कविता दोहोंमधला सेतु होते.

महाराष्ट्रभर कविसंमेलनातून कवितेचा ते जागर मांडतायत..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवीसंमेलनात तीन वेळा निमंत्रित कवी संमेलनामध्ये सहभागी झाले त्यामुळं कविता महाराष्ट भर पोहचली.आकाशवाणी वरुन कवितांचे प्रसारणझाले.

Web Title: Esakal Citizen Journalism Govind Patil article