प्रबोधनात रंगलेला शिवशाहीर...

गोविंद के. पाटील
सोमवार, 4 जून 2018

कोल्हापूर जिल्ह्यातील महे (ता. करवीर) येथील शेतकरी कुटुंबात शिवशाहिर रंगराव पाटील यांचा जन्म झाला..मराठा बॅंकेत कॅशियरची नोकरी करत त्यांनी शाहिर शहाजी माळी यांच्याकडेही शाहिरीचे धडे गिरवले.

वडील कुस्तीप्रेमी.. आपल्या पोरानं मोठा पैलवान व्हावं ही त्यांची अपेक्षा.. त्यासाठी घरातच त्यांनी तालिम सुरू केलेली..पण दहावीच्या वर्गात असताना अभ्यासाचं निमित्त करून देवळातल्या भजनात, किर्तनात हा मुलगा रमू लागला. आरे गावचे वरूटे महाराज यांच्या प्रभावाखाली येऊन स्वत: किर्तन, भजन करू लागला. पुढे महे या आपल्याच गावातील गावडे शाहिरांच्या फडात शाहिरीची सुरवात झाली.  पुढे त्याने मुद्रा भद्राय राजते या महानाट्य केले. या नाटकाच्या सुत्रधाराचे नाव आहे शिवशाहीर रंगराव पाटील.

कोल्हापूर जिल्ह्यातील महे (ता. करवीर) येथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला..मराठा बॅंकेत कॅशियरची नोकरी करत त्यांनी शाहिर शहाजी माळी यांच्याकडेही शाहिरीचे धडे गिरवले. संगीत क्षेत्रातील कलावंत गोळा करून शब्दसुरांच्या रेशीमगाठी हा मराठी वाद्यवृंद काढून रंगरावानी व्यावसायिक निर्मितीच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. ग्रामीण भागात कुठेही उपलब्ध नसलेलं कलेचं टॅलेंट असतं. त्याला योग्य संधी मिळणं गरजेचे असते.  हे ओळखून त्यांनी आपले भाऊ युवराज पाटील यांना पोवाडा लिहिण्यासाठी प्रेरणा दिली आणि मुद्रा भद्राय राजते या पहिल्या पोवाडा  महानाट्याची निर्मिती झाली..नाटक आणि सिनेमा या दोन्ही प्रांतात गुणवत्ता असूनही उपेक्षित ठरलेले प्रकाश पाटील यांनी या महानाट्याचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय शिवशाही ते लोकशाही -शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा सांगणारा "भीमगर्जना "या कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली आहे.

स्वराज्यधर्म नावाचे आणखी एक पोवाडानाट्य त्यांच्या नावावर आहे. शासनाचे विविध विकास प्रकल्प जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करत असतात. गावाकडची कलाप्रेमी साधीच माणसे या महानाट्यातून पुढे येत आहेत. रंगरावांच्या संचात बतावणी करणारे संजय मोहितेंसारखे कलाकार आज सिनेमात चमकतांना दिसतात. भावी काळात ग्रामीण भागातील कलाकारांना चांगली संधी असल्याचे ते सांगतात. सध्या तरी त्यांच्या शाहिरी संचाची शेतीची कामे सांभाळून कलेच्या या प्रांतात  मुशाफिरी सुरू आहे

Web Title: Esakal Citizen Journalism Govind Patil article on Shivsahahir