पाण्यासाठी आता अखेरचा घाव

महादेव अहिर
मंगळवार, 26 जून 2018

२६ जून १९९३ ला टेंभूसह ताकारी, म्हैसाळ योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक घटकाला मिळाले पाहिजे. ही मागणी घेऊन क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी शासनाशी संघर्ष सुरू केला. चळवळीच्या हालचालीचे केंद्र आटपाडी होते. ऊन, वारा, पाऊस झेलत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी एका तंबूतून ही चळवळ नेटाने चालवली. आज या चळवळीचा वटवृक्ष झाला आहे. २४ वर्षे अखंड लढली जाणारी देश पातळीवर एकमेव लढाई आहे. 

सुरवातीच्या काळात चळवळीला कार्यकर्ते मिळवणे, सामाजिक पाठबळ निर्माण करणे, अशा असंख्य अडचणी समोर होत्या. मात्र नागनाथअण्णांच्या अफाट इच्छाशक्‍तीकडे काहीही  अशक्‍य नव्हते. बघता बघता लाखोंचे पाठबळ या चळवळीला मिळाले. चळवळीच्या तगाद्याने रखडलेले टेंभू, म्हैसाळ योजनेची कामे मार्गी लागली आहेत. त्या शिवाय या चळवळीमुळे शासनाला कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करावी लागली. हा चळवळीच्या रास्त व न्याय मागण्यांचा परिणाम मानला जातो. 

नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या चळवळीला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, साथी निळू फुले, बाबा आढाव, यांनी कायम चळवळीची व्यासपीठे गाजवली. विविध पक्षांच्या पुढाऱ्यांनी पक्षाची कवच कुंडले बाजूला ठेवत चळवळीत योगदान दिले. 

माजी मंत्री आमदार गणपतराव देशमुख तर या चळवळीचा स्थापनेपासून आतापर्यंत अविश्रांत लढत आहेत. तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या योजनांच्या कार्य क्षेत्रात उभारले जावेत, अशी प्रमुख मागणी आहे. नागनाथअण्णांनी आपले कार्यक्षेत्र सोडून पिढ्यांन पिढ्या दुष्कांळाचे चटके सोसणाऱ्या १३ दुष्काळी तालुक्‍यांची तहान भागवण्यासाठी सुरू केलेली लढाई आज (ता.२६) रौप्य महोत्सव साजरा करीत आहे.

Web Title: Esakal Citizen Journalism Mahadev Ahir article