नऱ्हे गावात पाण्याची समस्या गंभीर

अभिजीत
बुधवार, 10 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- महानगरपालिका हद्दीलगतच्या नऱ्हे गावात गृहनिर्माण प्रकल्प झपाट्याने वाढत असताना पाणी पुरवठ्याची समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दहा दिवस सोसायट्यांना पाणी मिळत नाही. मिळणारे पाणी पुरेश्या दाबाने मिळत नाही. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या मात्र खूपच अपुऱ्या आहेत. याचाच फायदा टँकर माफीया घेताना दिसत आहेत.

जवळपास प्रत्येक सोसाटीचे केवळ पाण्याच्या टँकरचे बिल 40 ते 50 हजार प्रति महिना असे पावसाळ्याचे 3 ते 4 महिने सोडले तर इतर महिन्यांचे 3 ते 5 लाख केवळ पाण्यासाठी खर्च होत आहेत. हा एक टँकर माफियांचा व्यवसाय होऊन बसला आहे. यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा हात असून जाणूनबुजून या गोष्टिंकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामपंचायती मध्ये विचारणा केली तरी उडवा उडावीची उत्तरे मिळतात. पाणीपट्टी मात्र पूर्ण वर्षाची वसूल केली जाते. बाजूची दोन्ही गावे आंबेगाव आणि धायरी महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झाली आहेत पण नर्हेगाव ची परिस्थिती सध्या फारच बिकट आहे. गावातील नागरिक पाण्यामुळे हैराण झाले आहेत. एकीकडे घराचे हफ्ते, सोसायटी देखभाल फी आणि वरून विकतचे पाणी. आर्थिक सांगड घालता घालता लोकांच्या नाकीनऊ आले आहे. एकंदर परिस्थिती फार गंभीर आहे. हे असेच चालू राहिले तर काही दिवसांनी जगणे मुश्किल होईल अशी लोकांची भावना आहे.

 

Web Title: Esakal Citizen Journalism narhe water shortage

टॅग्स