३० किलोवॅट रुफटॉप सोलर सिस्टिमचे बावधन येथे उद्घाटन

solar system
solar system

पुणे- नगरसेवक श्री दिलीप वेडे पाटील यांच्या हस्ते ३० किलोवॅट रुफटॉप सोलर सिस्टिमचे बेलाविस्टा अपार्टमेंट बावधन येथे उदघाटन करण्यात आले. ह्यावेळी माननीय नगरसेवक श्री किरण दगडे पाटील, नगरसेविका सौ.श्रद्धा प्रभुणे व सौ अल्पना वर्पे उपस्थित होत्या.

सोलर प्रोजेक्ट सुरु झाल्यामुळे महिन्याला ३४०० विजेचे युनिट्स तयार होणार असून वार्षिक बिलापोटी ६ लाख रुपये बचत होईल. तसेच ३४ टन कार्बनडायऑक्सईड चे उत्सर्जन कमी होणार असल्याने पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे. तीन महिन्यापुर्वी कमिटी सभासदांनी सोलर प्रोजेक्टचा प्रस्ताव मांडल्यावर सर्व सभासदांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. विक्रमी वेळेत २३ लाख रुपये जमा करून 'अभिजात ऊर्जा' ह्या कंपनीला काम देण्यात आले. त्यापूर्वी ५ विविध कंपनी कडून निविदा मागवून त्याचा सखोल अभ्यास करण्यात आला होता. 
बेला विस्टा चे सभासद व अनुभवी इंजिनीयर श्री. रवी रानडे ह्यांनी ह्या कामात मोलाचे मार्गदर्शन केले. कमिटी मेंबर श्री. अभिजीत श्रोत्रे , चेअरमन श्री. ललित फडणवीस , श्री. विक्रम राजपूत , श्री. कौशिक जोशी , श्री. अतुल आवळस्कर व श्री राहुल कुलकर्णी ह्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. अभिजात ऊर्जा तर्फे श्री नितीन बोधले व श्री सुनील नारखेडे ह्यांनी काम पहिले. 

आता सोसायटीने 'ऑरगॅनिक गार्डन' चा उपक्रम सुरु केला असून सेंद्रिय पद्धतीने सोसायटी मध्ये भाज्या व फळे ह्यांची लागवड केली जात आहे. घातक कीटकनाशक न वापरता सोसायटीमधील गांडूळखत प्रकल्पातील खत तसेच गाईचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले 'जीवामृत' वापरण्यात येत आहे. यामुळे ओला कचरा सोसायटी मध्ये जिरवून भाज्या पिकवण्यास मदत होईल. श्री हेमल शाह व श्री निरंजन उपासनी या उपक्रमास विशेष मार्गदर्शन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com