राजकीय संघर्ष संपला तरच विकास

राजकीय संघर्ष संपला तरच विकास

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न या प्रभागात मोठा आहे. चेन स्नॅचिंगचे प्रकार सातत्याने घडताहेत. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा व्हायला हवा, मात्र त्याचे शंभर टक्के नियोजन करण्याआधी लोकांना त्रास होईल, अशी भूमिका घेता उपयोगाची नाही.
- अर्चना कदम

रस्ते कामात बाजूपट्ट्यांवर लक्ष दिले जात नाही. पावसाळ्यात पाणी साचून रस्ते लवकर खराब होताहेत. खड्डे लवकर भरत नाहीत. ड्रेनेजची वाईट स्थिती आहे. ते पूर्ण कधी होणार?
सुनील माणकापुरे.

लोक नगरसेवकांवर समाधानी नाहीत. सुधार समितीने आवाज उठवल्यानंतर कामे झाली. रस्ता करण्याआधी गटारी केल्या पाहिजेत, अन्यथा पैसा पाण्यातच. आता प्रभाग मोठा झालाय, मग हे काय करणार?
- संजय साळुंखे.

‘‘नगरसेवक घरात सापडतच नाही. मी अनेकदा त्यांची सही घेण्यासाठी गेले, मात्र एकदाही दिसले नाहीत. या कार्यक्रमातच दर्शन झाले.’’
- नीता सलगर.

‘‘गेल्या वीस वर्षांत या भागातील रस्ते, पाणी, गटारीची समस्या सुटत नसेल, तर मग उपयोग काय? मी सामाजिक कार्यात आहे चांगले लोक निवडून आले तरच प्रश्‍न सुटतील. नगरसेवकांवर वचक हवा.’’
- अभय मगदूम 

आजही या प्रभागात रस्ते, पाणी, गटारीवर बोलले जातेय. आपण स्मार्ट कधी होणार?  केवळ राजकारण करून  चालणार नाही. इथले पायाभूत प्रश्‍न सोडवतानाच नवा विचार घेऊन काम केले पाहिजे.
- बसवराज पाटील

‘‘या प्रभागातील रस्त्यांबाबत नगरसेवक अजिबात गंभीर नाहीत. किमान शाळेला जोडणाऱ्या रस्त्यांची तरी नीट देखभाल केली पाहिजे. शाळकरी मुले जीव मुठीत घेऊन जात असतात.’’
- नारायण पाटील. 

पुणे मेट्रो ट्रेनचा, सोलापूर स्मार्ट सिटीचा, 
कोल्हापूर हद्दवाढीचा विचार करतेय. कचरा उठाव करायला फायली कशाला पुढे सरकाव्या लागतात? टक्केवारी असेल, तरच फाईलीचा प्रश्‍न येतो. 
- ॲड. अरुणा शिंदे

समस्यांचा डोंगर उभा आहे. तरुणांच्या हितासाठी इथे कुणीच काही बोलत नाही. समस्यांवर उतारा  शोधण्यासाठी चांगल्या माणसांची गरज आहे. नगरसेवक तोंड दाखवत नाही, प्रश्‍न सुटणार 
कसे?
- मारुती नवलाई, सामाजिक कार्यकर्ते. 

‘‘उमेदवार निवडताना त्याने प्रभागात आतापर्यंत काय  काम केले आहे, हे लोकांनी आधी तपासले पाहिजे. प्रभागात पार्किंगचा प्रश्‍न गंभीर होणार आहे, त्याचे आतापासून नियोजन हवे.’’
- सुधीर नवले. 

या प्रभागात क्रीडांगणांचा विकास झाला नाही. ड्रेनेजचा प्रश्‍न मोठा आहे. पिण्याचे पाणी वरच्या मजल्यावर येतच नाही.
-प्रीती चिमण्णा

जाहीरनाम्यातील वचन पूर्ण करण्याची नगरसेवकांची जबाबदारीच आहे. कल्पद्रूम क्रीडांगणावरील व्यावसायिक कार्यक्रम बंद झाले  पाहिजेत.  शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कामाची गरज आहे.’’
- सुरेश पाटील, माजी महापौर

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विचारले पाहिजेत. आयुक्त फायली का तटवतात? शहराचा विकास या मुद्द्यावर साऱ्यांनी एकत्र आले तरच सांगलीचे भवितव्य चांगले होईल.
- शेखर इनामदार, माजी उपमहापौर

आमदार सुधीर गाडगीळ यांच्यामुळे रस्त्याची कामे होत आहेत. ओला कचरा, सुका कचरा याबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. घंटागाडीवाले ओला कचरा घेत नाहीत. त्यात सुधारणा गरजेची आहे. 
-नीता केळकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष

धोरण नगरसेवकांनी ठरवायचे आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करायची असते. इथे नेमके उलटे झाले आहे. आम्ही पालिकेच्या बाहेर असून कामे करून  घेतो, हे आत असून हतबल का?’’
- ॲड. अमित शिंदे, सांगली सुधार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com