मुलींना पटावायला मुलं करतात 'या' गोष्टी

सकाळ संवाद
Monday, 13 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

फॅशनमुळे व्याधी उद्‌भवू शकतात 
पुणे: आजकाल तरुणाईला काय आवडेल, हे सांगता येणे कठीण आहे. त्यांची फॅशन दररोज बदलत आहे. त्यात तरुण मुलींना दाढी वाढवणारी आणि बॉडी बिल्डिंग करणारी मुले आवडतात, असे समजून अनेक मुले प्रचंड महागडी अशी केमिकल औषधे, पदार्थ खाऊन आपले भविष्य अंधारात ढकलत आहेत. कारण यामुळे तात्पुरता फरक पडत असला तरी त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेता हे भयंकर आहे. यामुळे नपुसंकता, कॅन्सर, सोरायसिस अशा भयंकर व्याधी उद्‌भवू शकतात, त्यामुळे तरुणांनी असे आचरट प्रकार टाळावेत. 
- संकेत 

 

Image may contain: one or more people, shoes, child and outdoor

 

औंधमध्ये धोकादायक चेंबर अन् केबलमुळे अपघाताचा धोका 
औंध : येथील गणेशखिंड रस्त्यावरील केंद्रीय विद्यालयानजीकच्या पदपथावर उघड्या चेंबरमुळे; तसेच आतील केबलमुळे नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सतत वर्दळीच्या या पदपथावर केबलसाठी तयार केलेला हा चेंबर उघडा ठेवल्याने येथून ये-जा करणाऱ्यांना व विद्यार्थ्यांना सहजासहजी निदर्शनास येत नाही. यातील बाहेर आलेल्या केबलचाही अडथळा निर्माण होत आहे. चेंबर सुरक्षित करण्यासाठी महापालिका, महावितरण, पोलिस आणि संबंधितांनी पुढाकार घ्यावा. 
-नितीन राजे 

 

Image may contain: 1 person, shoes

"सकाळ' चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
दापोडी : "सकाळ'ने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला दापोडीतील गणेश इंग्लिश मीडियम स्कूल या केंद्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी अत्यंत तन्मयतेने चित्रे काढली. पालकांनाही त्यामुळे समाधान वाटले. 
-पुरुषोत्तम वाखरे 
 

पीएमपीतील दिव्यांगांच्या राखीव आसनांबाबत कडक नियम करा 
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या साठ लाख लोकसंख्येसाठी सार्वजनिक वाहतूकसेवा पुरवणाऱ्या पीएमपी बसच्या सर्व बसमध्ये दिव्यांगांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तशा सूचना त्या आसनाच्या आसपास लिहिलेल्या असतानाही त्यांना उभे राहून प्रवास करणे शक्‍य नसते. 
अशा नेत्रहीन, दिव्यांग बांधवांना राखीव असलेल्या जागेवर वृद्ध प्रवासी बसले समजू शकतो; मात्र त्या आसनावर कायमच तरुण, महिला, धडधाकट प्रवासी बसलेले असतात. त्यांना विनंती करूनदेखील ते उठत नाहीत. त्यामुळे दिव्यांगांना उभे राहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे दिव्यांगांना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय एकच आणि तो म्हणजे जशी रेल्वेत दिव्यांगांच्या जागा अडवणाऱ्यांना पाचशे रुपये दंडाची तरतूद आहे तशी ती पीएमपी बसमध्ये अमलात आणावी. असा कायदा करून तो काटेकोरपणे राबविल्यास दिव्यांगांची अडवणूक करण्याचे धाडस धडधाकट माणसे करणार नाहीत. पीएमपी अधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या या प्रश्नात लक्ष घालून दव्यांगांची उपेक्षा थांबवावी ही विनंती. 
-सुनील शिंदे 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experiments that boys do to attract girls