हिंदू जनजागृती समिती तर्फे चुकीचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : एकिकडे नागरिक घरी पाण्याच्या बादल्यांमध्ये, कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन करत आहेत, समाज आता कुठे पर्यावरणाची काळजी कराय़ला लागला आहे. तर याची दजुसरी बाजु अशी की पुण्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीची लोकं शास्त्राच्या नावाखाली चुकिचा संदेश पोचवत आहेत. काल पुण्यात हिंदु जनजागृती समितीची लोकं, बॅनर घेऊन थांबली होती. त्यावर लिहिलेलं होत 'श्रींचे विसर्जन वाहत्या पाण्यात करा, प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तींचे विसर्जन असे करणे हे शास्त्र आहे.' शास्त्र निसर्गाबद्दलजे सांगतं त्याचा अभ्यास हि लोकं का करत नाहीत? 

Image may contain: 1 person, standing

ज्या गणपती बाप्पाची पुजा दहा दिवस करायची, त्याच बाप्पाच्या मुर्तीला अस वाहात्या पाण्यात बेवारस सोडायचं. यामुळे त्या मुर्तीचे होणारे तुकडे आणि मुर्तींच नाल्यात सापडण, हे आपलं शास्त्र आहे का? शास्त्र आणि मानवी स्वैराचार यामधला फरक ओळखणं आता गरजेचं झालं आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: False message spread by Hindu Janajagruti Samiti