फुटपाथ व रस्त्यांची कामे संथ गतीने 

अनिल  अगावणे
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : शहरातील फुटपाथ रस्ते यांची कामे पावसाळ्यापूर्वी करून न घेतल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी तसेच पादचाऱ्यांना फुटपाथचा वापर करता येत नाही. त्यामुळे वाहन चालक असो की पादचारी यांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो आहे.

पुढच्या महिन्यात पालख्यांचे आगमन होणार आहे, तसेच पावसाने दडी मारल्यामुळे तरी प्रशासनाने फुटपाथ व रस्त्यांची कामे पूर्ण करून घ्यावीत. तरच अपघात, वाहतूक कोंडी, पार्किंग, जीवितहानी सारखे प्रकारांना आळा बसेल. कामाची गुणवत्ता, पारदर्शकता, नियोजन याची सांगड प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे दिसत नाही, हे सर्व विकास कामात दिसून येते.  कारण शहरात ही कामे सुरू झाल्यामुळे सर्वत्र ढिसाळ कारभार दिसत आहे.

 

Web Title: foothpath and road works in slow motion