पुणेकरांनो, हे वागण बरं नव्हं ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणेकरांनो, हे वागण बरं नव्हं ! 
सिंहगड रस्ता : स्वच्छ भारत अभियानात पुणे शहर अव्वल येण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत; मात्र फन टाइमजवळील कचरा साठला आहे. हे चित्र पाहून आपण खरंच स्वच्छ पुण्यासाठी प्रयत्नशील आहोत का? याची जाणीव करून देते. 
- महेश पोकळे 

Image may contain: plant, outdoor and nature

वीर बाजी पासलकर पुलाजवळ मोटार पडून

सिंहगड रस्ता : पुण्यात 4 महिन्यांपूर्वी झालेल्या प्रचंड पावसात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच वेळी वाहून आलेल्या या चारचाकी गाडीची दुरवस्था झाली आहे. ही गाडी अजूनही वीर बाजी पासलकर पुलाजवळ पडून आहे. तिचे अनेक भाग हळूहळू काढून घेतले जात आहेत. कालांतराने ही गाडी कोणाची आहे, हेदेखील कळणार नाही. या बेजबाबदार वृत्तीला जबाबदार कोण? 
- संस्कृती तोरकडी 

Image may contain: motorcycle and outdoor

#SakalImpact  : 'सकाळ'मुळे खांबावरील वेलींचा विळखा सुटला
 
धायरी : धायरी- नऱ्हे रस्त्यावर पारी कंपनी चौकाजवळ या पथदिव्यांच्या खांबाला अनेक महिन्यांपासून वेली लपेटलेल्या होत्या. त्यामुळे प्रकाश रस्त्यावर पोचत नव्हता. 'सकाळ संवाद'ने 25 डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने त्या वेली काढून टाकल्या. "सकाळ'चे खूप आभार. 'सकाळ'चा इम्पॅक्‍ट मोठा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध होते. 
- सचिन जाधव 

Image may contain: plant, sky, tree and outdoor
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage issue in sinhagad Road Pune