कॅनॉल रोडवर राडारोडा व कचरा हटवावा 

शिवाजी पठारे
सोमवार, 25 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कोथरूड-कर्वे रोडला समांतर असणाऱ्या कॅनॉल रोडवर यश एलिना इमारती समोर कर्वे रोडवरील हॉटेल व्यावसायिक राडारोडा व कचरा कॅनॉल रोडवर टाकतात. हा कचरा वेळीच उचलला जात नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास होत आहे. यात प्लॅस्टिक कचऱ्याचा ही समावेश आहे. हे व्यावसायिक हॉटेल धुतल्यावर सर्व पाणी रस्त्यावरच सोडतात. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे. महापालिकेने याची दखल घेऊन हॉटेल व्यावसायिकांना ताकीद द्यावी व कचरा लवकर उचलावा.

Web Title: garbage should be removed near canal road

टॅग्स