esakal | ओंकारेश्‍वर दशक्रिया घाटावर  गुरुजींची अरेरावी
sakal

बोलून बातमी शोधा

pandit.jpg

पुणे ः शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर दशक्रिया विधी घाटावर नुकताच नातेवाइकाच्या निधनानिमित्त विधी करण्यासाठी जाण्याचा योग आला असता, तेथील विधी करणाऱ्या गुरुजींकडून दादागिरी, हुकूमशाहीची भाषा वापरली जात असल्याचा अनुभव आला.

ओंकारेश्‍वर दशक्रिया घाटावर  गुरुजींची अरेरावी

sakal_logo
By
- विनायक खटावकर

पुणे ः शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर दशक्रिया विधी घाटावर नुकताच नातेवाइकाच्या निधनानिमित्त विधी करण्यासाठी जाण्याचा योग आला असता, तेथील विधी करणाऱ्या गुरुजींकडून दादागिरी, हुकूमशाहीची भाषा वापरली जात असल्याचा अनुभव आला.

पणजोबांचे नाव न आठवल्याने अपमान करण्यात आला. पीठ मळण्यास न जमल्याने व उशीर झाल्याने तेथील गुरुजी मोठ्या आवाजात ओरडले. घाटावर येणारे नागरिक अगोदरच दुःखी असतात आणि गुरुजींच्या असल्या वागण्यामुळे दुःखात भर पडते. त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैसेही आकारले जातात. त्यांची मक्तेदारी मोडणे गरजेचे आहे. सर्व जातीधर्माचे या ठिकाणी विधी करण्यास महापालिकेने परवानगी द्यावी, तसेच बाहेरील गुरुजींनाही येथे पूजा करण्याची संधी द्यावी. वाजवी दक्षिणा घेण्याबाबतचे फलक पुणे महापालिकेने लावावेत. यावर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. 
- विनायक खटावकर