हडपसर गाडीतळ येथील  वाहतूक परिस्थिती त्रासदायक 

सकाळ संवाद
Sunday, 8 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

हडपसर गाडीतळ येथील 
वाहतूक परिस्थिती त्रासदायक 

पुणे : हडपसर गाडीतळ येथे चौकातील वाहतूक परिस्थिती खूपच त्रासदायक ठरत आहे. सासवडकडून येणारी वाहने आणि लोणी, यवत, सोलापूरकडून येणारी वाहने या चौकात एकत्र येतात. नेमके याच रस्त्यावर पीएमपीचे बस स्थानक उभारले आहेत. त्यामुळे सासवड रस्ता लहान झाला आहे. गाडीतळ येथून फुरसुंगी, सासवडकडे जाणाऱ्या बसदेखील येथेच थांबतात. पुण्यावरून येणारी वाहने पोलिस चौकीला वेढा घालून पुढे जात असतात. या रस्त्यावर एका बाजूला अपघातातील वाहने लावली आहेत. दुसरीकडे दुचाकीचे अवैधरीत्या पार्किंग असते. तेथे लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी सासवड, बारामतीकडे जाणाऱ्या वाहनांचे लाईट पादचाऱ्यांच्या डोळ्यांवर येतात. त्यामुळे पुढचे काहीच दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हा चौक एक अपघात चौकच बनला आहे. 
चौकाच्या चारही बाजूंनी रिक्षांचा वेढा आहेच. याकडे पुणे परिवहनच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. "मरे एक त्याचा दूजा शोक वाहे...' असे मात्र होऊ देऊ नका ही विनंती ! 
- पंडित हिंगे 

Image may contain: car, sky and outdoor

येरवडा परिसरातही 
दिशादर्शक फलक लावावेत 

पुणे : ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या आवारात लावण्यात आलेले "नो हॉर्न', "नो पार्किंग', "शाळेची वेळ', "शाळेच्या व्हॅन पार्किंग', "विद्यार्थ्यांच्या सायकल पार्किंग' अशा प्रकारचे दिशादर्शक फलक प्रशालेच्या 200 मीटरच्या परिसरात उभे करण्यात आले आहेत. महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन ! असे दिशादर्शक फलक येरवडा येथील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातदेखील उभारण्यात यावेत. आवश्‍यक त्या ठिकाणी असे उपक्रम राबवावेत. 
- मनोज शेट्टी 

Image may contain: outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Hadapsar Traffic conditions troubling