#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
पसायदान संकुलमध्ये होळी, धुळवड साजरी
मांगडेवाडी : येथील पसायदान संकुल सोसायटीतर्फे होळी आणि धुळवड साजरी करून एक सामूहिक एकतेचा नवा पायंडा घालण्यात आला. या वेळी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक व महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. या वेळी संस्थेच्या वतीने सध्या चालू असलेल्या कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
- विकास गुरव
गोकुळनगरमधील खड्डे बुजवावेत
गोकुळनगर : येथील सर्व्हे नंबर 58, स्टेट बॅंकेची लेन व आजूबाजूच्या परिसरात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत महानगर गॅस कंपनीने खोदकाम केले आहे. परंतु, गॅस कनेक्शन तर दूरच राहिले आहे. तसेच येथे खोदलेले खड्डेही व्यवस्थित बुजवले नाहीत. याबाबत महापालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर 8. 2. 2020 रोजी तक्रार नोंदवून ही कार्यवाही झाली नाही. तसेच महापालिकेच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना इमेलद्वारे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी.
- मिलिंद अहेर
महात्मा फुले पेठ : रजपूत लोहार कार्यालयाजवळ गेल्या 15 दिवसांपासून कचरा पडला आहे. तो त्वरित उचलावा.
- प्रतीक