#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
सूस रस्त्याला अवैध पार्किंगचा विळखा
पाषाण : सूस रस्त्यावर साई चौक ते शिवशक्ती चौक यादरम्यान एका मागे एक अशी वाकडी-तिकडी वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. येथे अपघात
होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. पुणे वाहतूक विभागाकडून येथे सम आणि विषम पार्किंगपद्धती राबवावी, जेणेकरून बेशिस्त वाहनचालकांना चाप बसेल.
- महेश खाणेकर
पाण्याची गळती लागलेल्या
वाहिनीची दुरुस्ती करावी
चिंचवडगाव ः काकडे टाउनशीप "जी' व "एच' बिल्डिंगच्या समोर पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीला गळती लागल्याने, बरेच पाणी वाया जात आहे. पुष्कळदा महापालिकेच्या
अधिकाऱ्यांना सांगूनदेखील याबाबत कार्यवाही केली जात नाही. पाण्याची गळती लागलेल्या या वाहिनीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी.
- जयवंत पवार
कोंढवा रस्त्यावर पाणपोईमुळे सुविधा
कात्रज : कडक उन्हाळ्यात पादचाऱ्यांची, विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाणी मिळावे, यासाठी कात्रज येथील अप्पा फॅन क्लबने कात्रज कोंढवा रस्त्यावर माउली पाणपोई सुरू केली. क्लबचे कार्याध्यक्ष सुरेश मामा कवडे, प्रसिद्धिप्रमुख वसंतराव कदम, किरण खोपडे, प्रा. झेंडेसर, अनिल धायबर, सरपाले मामा, श्रीरंग महांगरे, संदीप शिंदे,
उषा जगताप, मुक्ता कदम, प्रकाश मोरे, विनायक हंबीर, समीर हिरगुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
- राजेश महांगरे