माहिती फलक प्रत्येक वृक्षांवर लावा

अनिल अगावणे
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे : वृक्ष गणना क्रमांक, कोणत्या जातीचे वृक्ष आहे, वृक्षाचे अंदाजे वय असे फलक प्रत्येक वृक्षावर असलाच पाहिजे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. कधी विकासाच्या, बांधकामाच्या, सायकल ट्रॅक, महामेट्रोच्या नावाखाली यावर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक झाडावर वृक्ष गणना क्रमांक, वृक्ष कोणत्या जातीचे आहे, वृक्षाचे अंदाजे वय असे फलक प्रत्येक वृक्षावर असलाच पाहिजे. यामुळे लहानांपासून मोठयापर्यंत सर्वांना वनस्पती शास्त्राचे ज्ञान अवगत होईल. कारण कित्येकांना वृक्ष कोणता आहे हेच माहिती नसते.

फळे फुले पाहुनच काहींना कळते की हे झाड अमुक-अमुक आहे. शिवाय वृक्ष गणना क्रमांक असल्यास ती झाडे तोडताना होणारी शिक्षा, दंड काय असतो याची कल्पना सर्वांना नसल्याने बेकायदेशीर वृक्ष तोडीचे प्रमाण वाढते आहे, ते कमी होण्यास मदत होईल. याचा प्रशासनाने व राज्यसरकारने गांभीर्याने विचार करून वृक्षांवर वृक्ष गणना क्रमांक, कोणत्या जातीचे वृक्ष आहे, वृक्षाचे अंदाजे वय असे फलक प्रत्येक वृक्षांवर असलाच पाहिजे.
 
Web Title: The information board should be on every tree