#MarathaKrantiMorcha आरक्षण

शनिवार, 4 ऑगस्ट 2018

अहो कसलं आलय आरक्षण इथं आम्हीच मरतोय प्रत्येक क्षण प्रत्येक वेळी आरक्षणाच्या नावाखाली आमचेच भक्षण कोणीतरी जन्म घेईल का करायला आमचे रक्षण... नका देऊ आरक्षण जाती धर्मावर  तर द्या ते गुणवत्तेवर अस म्हणणारं कोणी तरी येईल का सत्तेवर... आरक्षणच्या नावावर देताय तुम्हाला पटलं असा टक्का पण आमच्या आमच्यातच लावताय तुम्ही झगडा पक्का.. तुमचं मात्र भरतय पोट खाऊन जनतेची नोट घेउन सामान्यांचे वोट आमचा मात्र रोज होतोय कडेकोट नका घेऊ आता आमच्या नरडीचा घोट..

अहो कसलं आलय आरक्षण
इथं आम्हीच मरतोय प्रत्येक क्षण
प्रत्येक वेळी आरक्षणाच्या नावाखाली आमचेच भक्षण
कोणीतरी जन्म घेईल का करायला आमचे रक्षण...

नका देऊ आरक्षण जाती धर्मावर 
तर द्या ते गुणवत्तेवर
अस म्हणणारं कोणी तरी येईल का सत्तेवर...

आरक्षणच्या नावावर देताय तुम्हाला पटलं असा टक्का
पण आमच्या आमच्यातच लावताय तुम्ही झगडा पक्का..

तुमचं मात्र भरतय पोट
खाऊन जनतेची नोट
घेउन सामान्यांचे वोट
आमचा मात्र रोज होतोय कडेकोट
नका घेऊ आता आमच्या नरडीचा घोट..

अहो कसलं आलय आरक्षण
हे तर सगळं राजकारणाचं लक्षणं
इथं सारच आहे विलक्षण...