काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड

शिवराम वैद्य
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, राजकारण, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

२८ डिसेंबर, २०१७ ! संसदेमध्ये आजचा दिवस ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा होता. देशातील मुस्लिम महिलांवर अन्याय करणाऱ्या, त्यांना स्वाभिमानाचे जीणे नाकारणाऱ्या, त्यांच्यावर सतत दबाव ठेवणारा तीन तलाक हा अमानवी प्रकार बेकायदा आणि अजामिनपात्र गुन्हा ठरवण्यासाठीचे विधेयक संसदेत सत्ताधारी पक्षातर्फे मांडले गेले. या विधेयकाचे समर्थन करावे की त्याचा विरोध करावा या "धर्म"संकटात काँग्रेस पक्ष सापडला आहे. 

स्वातंत्र्यापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाशवी बहुमत असुनही, मुस्लिम महिलांवरील अन्यायाच्या बाबतीत त्यांनी कधीही सहानुभुतीपूर्वक विचार तर केला नाहीच पण शहाबानो खटल्यामध्ये, पाखंडी मुस्लिम धर्मगुरुंच्या आणि नेत्यांच्या दबावाखाली, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल फिरवण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली होती. त्यामुळे आता या विधेयकाबाबत काय करावे याचा निर्णय करतांना काँग्रेसच्या नेत्यांनी जो "मध्यममार्ग" स्वीकारला आहे तो त्यांच्या "होयबा आणि नायबा" प्रवृत्तीला साजेसाच आहे. हा कायदा झालाच तर तलाक दिल्यानंतर नवरोबांना "आत" टाकले तर त्याच्या कुटुंबियांची जबाबदारी कोण घेणार, त्याच्या बायका-पोरांनी कुठे जायचे, हे विधेयक आणण्याची एवढी काय घाई आहे, हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे विचारविनिमय करण्यासाठी सोपवले जावे अशी शाब्दिक मखलाशी काँग्रेसचे नेते करत असले तरीही त्यांच्या मनातील "अंदर की बात" काय आहे हे कोणताही चाणाक्ष माणूस ओळखू शकेल. 

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, राजकारण, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

आपल्या सरकारला साठ-सत्तर वर्षांमध्ये जे जमले नव्हते ते मोदी सरकार केवळ चार वर्षांच्या काळात करून दाखवत आहे, देशातील बहुसंख्य मुस्लिम संघटना, पुरुष आणि महिलांचा त्यांना पाठिंबा आहे आणि महत्वाचे म्हणजे त्याचे श्रेय मोदी सरकारला जात आहे ही काँग्रेसच्या नेत्यांची सर्वात मोठी पोटदुखी आहे. काहीही असले तरी हा कायदा, धर्म-जातीच्या, राजकारणाच्या जोखडामध्ये न अडकवता काँग्रेसी नेत्यांनी त्याला बिनशर्त पाठिंबा द्यावा यातच काँग्रेसचे हित आहे.

Web Title: Marathi news citizen journalism in Marathi Political opinions of citizen