ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी स्वच्छता गृहाची उभारणी

राजेंद्र गोयल
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- 'लायन्स क्लब पुणे' विजयनगर तर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेऊन नामदेवराव मोहोळ विद्यालय, खांबोली, ता.मुळशी या ठिकाणी स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात आली.

या स्वच्छतागृहाचा हस्तांतरण सोहळा गिरीश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खेडकर यांना हस्तांतरण पत्र सुपूर्द करण्यात आले. माजी प्रांतपाल अरुण शेठ, सचिव सुजाता गोयल, मिताली गुजर उपस्थित होते. अध्यक्ष पूर्णिमा शहाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि आज जगामध्ये कानाकोपऱ्यात टीव्ही, मोबाईल, इंटरनेट पोहचले आहे पण जीवनातील आवश्यक अत्यंत दैनदिन गरज असलेले मुलींचे स्वच्छता गृह नाही याचा त्रास नक्कीच मुलीना होत असणार या जाणीवेमुळे आम्ही येथे स्वच्छता गृह बांधून देण्याचा निर्णय घेतला. या स्वच्छतागृहासाठी रक्कम रु.दीड लाख देणगीद्वारे उभे करण्यात आले. या वेळी बोलताना प्रांतपाल गिरीश मालपाणी यांनी सांगितले कि लायन्सच्या माध्यमातून आम्ही शेक्षणिक क्षेत्रात जेथे आवश्यक तेथे कार्य करत आहोत. मुलींना शिक्षण देणे हि काळाची गरज आहे. अरुण शेठ यांनी हे आम्ही ग्रामीण भागात उभारलेले 18 वे स्वच्छता गृह असून भविष्य काळात गरज असेल तिथे आम्ही हे बांधून देणार आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गोयल यांनी केले.

 

Web Title: Marathi News Citizen Journalism toilet for girls lions club pune Rajendra Goyal news

टॅग्स