सार्वजनिक वाचनालयात गैरप्रकार

सकाळ संवाद
Friday, 17 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

शनिवार पेठ ः येथील सार्वजनिक वाचनालयात सध्या कचरा टाकला जात आहे. याकडे महापालिकेने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. 
- सुहास अवसरे 

 

Image may contain: people sitting

 

 

दिशादर्शक फलकावर फ्लेक्‍सबाजी 

सातारा रस्ता ः पंचमी हॉटेलजवळ असलेल्या दिशादर्शक फलकावर राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे फ्लेक्‍स पहायला मिळतात. कृपया संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे, की दिखाऊपणाचे नाही तर पूर्ण स्वच्छता अभियान राबवावे व मार्गदर्शक फलकाचा उपयोग त्याच्या मूळ उद्देशासाठीच होईल याची काळजी घ्यावी. 
- प्रसाद वाळेकर 

 

Image may contain: sky, tree and outdoor

 

 

 

चेंबरचे झाकण दुरुस्त करण्याची आवश्‍यकता 

भवानी पेठ ः येथील रस्त्यावर चेंबरच्या झाकणाला खड्डा पडला आहे. या मार्गावरून पीएमपी बस, चारचाकी वाहने, रिक्षा, टेम्पो दुचाकी वाहनांची ये जा सतत सुरू असते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची वर्दळदेखील असते. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर चेंबरचे झाकण दुरुस्त करावे. 
- विजय जगताप 

 

 

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे 

बुधवार पेठ ः क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. याला 172 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीसुद्धा या ऐतिहासिक वास्तूचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. ही अत्यंत चीड आणणारी बाब आहे. कारण ज्या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यांचे जतन झाल्यास आजच्या युवा पिढीला राष्ट्रपुरुषांचे, राष्ट्रसंतांचे स्मरण होत राहील. या ऐतिहासिक वास्तूचे स्मारक न करण्यामागे काही गौडबंगाल आहे का.? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे हे सर्व बाजूला ठेवून या ऐतिहासिक वास्तूचे राष्ट्रीय स्मारक बांधून पुणे शहराचा नावलौकिक वाढवावा. 
- अनिल अगावणे 
 

 

अभिरुची मॉलसमोर धोकादायक झाडाची फांदी 

सिंहगड रस्ता ः अभिरुची मॉलसमोरील कॉसमॉस बॅंकेशेजारील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या महापालिकेने तोडल्या आहेत. एक फांदी कापून तशीच झाडावर ठेवली आहे. येथे नागरिकांची खूप वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. तरी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी. 
- महेश पोकळे 
 

Image may contain: 1 person, plant, tree, outdoor and nature

 

 

प्रत्येक चौकात सीसीटीव्ही बसवावेत 
पुणे :  "शहरातील सिग्नल 24 तास' ही बातमी वाचून छान वाटले. हा एक स्तुत्य उपक्रम असून नागरिकांनी या उपक्रमाला साथ द्यावी. सध्या बेशिस्तपणे सर्रास वाहने चालवली जातात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यात तरुण वर्गाचा समावेश जास्त आहे; कारण त्यांना वेळेची किंमत अजूनपर्यंत कळलेली नाही. ह्यावर त्यांना समुपदेशनाची गरज आहे. रात्री बरेच लोक सिग्नल पाळत नाही. जे होईल ते बघू अशा भ्रमात राहून वाहने चालवली जातात. प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत म्हणजे पोलिसांचे काम कमी होऊन नियम मोडणाऱ्या चालकांना घरपोच दंडाची नोटीस बजावली पाहिजे. 
- जयंत जाखडे 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misconduct in public libraries