
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.
हडपसर : पुण्याच्या एम्प्रेस गार्डन जवळील या कालव्याच्या दुरावस्था झाली आहे. खडकवासला धरणातील पाणी मुठा कालव्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी पिण्यासाठी व पिकासाठी वापरले जाते. या कालव्यात सुज्ञ नागरिकांनी भिरकवलेला सडलेल्या कचऱ्याचा ढिग, ठिकठिकाणी तुटलेल्या व ढासळलेल्या बाजूच्या भिंती यामुळे प्रदुषन होत आहे.