नवीन पुलालाच धोका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

कोळवडी (ता. वेल्हे) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वांगणी फाटा ते कोळवडी काळूबाई मंदिर या रस्त्याचे डांबरीकरण यंदा पूर्ण झाले; परंतु कातवडी येथील ओढ्यावरती नव्याने पूल बांधला आहे. त्या पुलाच्या दोन्ही बाजूने काही ठिकाणी रस्ता खचला आहे. ओढ्याच्या बाजूने जो भराव टाकला होता, तो पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे नव्याने बांधलेल्या या पुलास धोका निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी रस्ता तुटण्याची दाट शक्‍यता आहे. त्या पुलाच्या कठड्यापासून कातवडी पाणी पुरवठा विहिरीपर्यंत संरक्षण भिंत होणे गरजेचे आहे. हा रस्ता तुटला तर कोळवडी आणि कातवडी या दोन्ही गावचा संपर्क तुटेल आणि नागरिकांची गैरसोय होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New bridge risk