जोतिबाच्या वाटेवर अनोळखी अपंग आजी

निवास मोटे
बुधवार, 17 जानेवारी 2018

दोन्ही पायांनी अपंग, वयाची सत्तरी ओलांडलेली एक आजी गेल्या काही महिन्यापासून जोतिबा डोंगराच्या वाटेवरील कुशिरे  येथे विसावली आहे. तिला फक्त कन्नड, तमिळ भाषाच बोलता येते. त्यातच ती तिचे नाव, पत्ता विसरली आहे.

दोन्ही पायांनी अपंग, वयाची सत्तरी ओलांडलेली एक आजी गेल्या काही महिन्यापासून जोतिबा डोंगराच्या वाटेवरील कुशिरे  येथे विसावली आहे. तिला फक्त कन्नड, तमिळ भाषाच बोलता येते. त्यातच ती तिचे नाव, पत्ता विसरली आहे.

कुशिरे ग्रामस्थांनी तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या भक्तांनी तिची ही अवस्था पाहून तिला मदत केली. काहींनी तिचे फोटो काढून ओळख पटविण्याचाही प्रयत्न केला आहे. पण अद्याप तिचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. सुरवातीला नागरिकांना ही वेडी महिला आहे असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण या आजीने दोन्ही पायाने अपंग असूनही राहती जागा शेणाने सारवली. स्वच्छ केली. दगडाची चुल मांडून तिने स्वयंपाकही सुरू केला. तेव्हा मात्र नागरिकांना तिच्याबद्दल उत्सुकता वाटू लागली. तिची विचारपूस सुरू केली. पण तिला मराठीच येत नसल्याने नेमकी माहिती मिळवण्यात अडचण आली. तिला कन्नड व तमिळ येते असे लक्षात आल्यानंतर काहींनी कन्नड भाषिकांना बोलावून तिची विचारपूस केली. पण तिला स्वतःचे नावही माहीत नाही. मग ओळख तरी तिची कशी पटणार. त्यामुळे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. चौकशीत फक्त ती रेल्वेने कोल्हापूरला आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या या आजीला दररोज पन्हाळा तालुक्‍यातील पोहाळे तर्फे आळते येथील सरदार ऊनाळे हे गरम भाकरी-भाजी देतात. ज्या रस्त्याकडेला आजीने आसरा घेतला आहे. तेथे जवळच राहणाऱ्या पाटील कुटूंबाने तिला साडी, चोळी, अंथरूण, पीठ, तांदूळ आणि सरपण देऊन आधार दिला आहे. काही दिवसापूर्वी तिने अपंग असून जमिनीवरून घसरत जाऊन जोतिबा देवाचे दर्शनही घेतले. या आजीची ही जगण्याची लढाई, संघर्ष पाहून तिला आधार देण्याची गरज आहे.

Web Title: Nivas Mote article

टॅग्स