कालव्याला सरंक्षण भिंत नाही

वि़जय अदागळे
मंगळवार, 19 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : बी. टी. कवडे रस्ता आणि रेसकोर्सला जोडणारा, एम्प्रेस गार्डनजवळील कालव्यालगतचा रस्ता जागोजागी खचलेला आहे. या कालव्याला सरंक्षण भिंत ही नाही. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, त्यात स्कूल बसची संख्याही खूप जास्त असल्याने मुलांसोबतच सर्वांच्याच जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र असे असूनही स्थानिक नगरसेवक, पुणे महापालिका, जलसंपदा विभाग यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत  आहे.

अपघात घडल्यास कोण जबाबदार राहणार? , असा प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याची आवश्यकता आहे.  

Web Title: no protection wall for canal