#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
अंबिल ओढा परिसरात दुर्गंधी
म्हात्रे पूल : पुलाजवळच्या शामसुंदर सोसायटीशेजारील अंबिल ओढ्यात (नाल्यात) आडवे पाइप टाकून सांडपाणी अडवल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
अंबिल ओढ्यातील पाइपचा बंधारा काढल्यास दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
- गुप्ते
आदर्श विद्यालय मुलींच्या शाळेचे यश
शुक्रवार पेठ : आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूलमधील शासकीय चित्रकला परीक्षेचा सन 2019 चा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के
लागला. एलिमेंटरीमध्ये लक्ष्मी कोळी ही बी श्रेणी मिळून उत्तीर्ण झाली. तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत कुसूम अली, लक्ष्मी यादव यांनी ए श्रेणी आणि सिद्धी घाटे,
दिशा जाधव यांनी बी श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका सविता बंगाळे तसेच आरती विटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा
समितीचे अध्यक्ष सुरेश चांफेकर, संस्थेचे कार्यवाह वि. ना. चव्हाण यांनी मुलींचे अभिनंदन केले.
- शीलरतन बंगाळे
म्हात्रे पूल : येथील श्री वृंदावन सोसायटीत गरज नसताना वेड्यावाकड्या पद्धतीचे पावसाळी गटाराचे अर्धवट काम केले आहे. यामुळे 40 टक्के रस्ता वापरण्यास
अयोग्य झाला आहे. अर्धवट कामामुळे वाहने व माणसे घसरून पडण्याचे प्रकार वारंवार होतात.
- प्रदीप गुप्ते
अप्पा बळवंत चौकात
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
अप्पा बळवंत चौक : येथे भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे. गेल्या एक दीड वर्षात येथील कुत्र्यांच्या टोळीने 20-25 मांजरे मारली आहेत. दिवसा शांतपणे
हिंडणारी कुत्री रात्री अचानक लहान प्राण्यांवर हल्ला करून त्यांना मारून टाकतात. जवळ असणाऱ्या इमारतीमध्ये शिरूनही प्राणी मारले जातात. महापालिकेने याकडे
लक्ष द्यावे.
- कादंबरी गाडगीळ