
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
तुटलेला विजेचा खांब तसाच
पडून राहिल्याने पादचाऱ्यांना त्रास
औंध : पाषाण येथून औंधकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर असलेला लोखंडी विजेचा खांब तुटलेल्या अवस्थेत पडला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी विजेचा खांब धोकादायक बनला आहे. एनसीएल पाषाण रस्ता या परिसरातील हा विजेचा खांब काही दिवसांपासून तसाच पडून आहे. तुटलेल्या अवस्थेत असलेल्या या खांबाचा सांगाडा पदपथावर तसाच ठेवल्याने लोखंडी साहित्य चोरीला जाऊ शकते. यामुळे ही समस्या त्वरित दूर करून पदपथ मोकळा करावा.
- नितीन राजे
वडारवाडीतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था
वडारवाडी : या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. येथील फरश्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. प्रशासनासह लोक प्रतिनिधी या कडे दुर्लक्ष करीत आहेत. वारंवार नागरिकांनी तक्रार दाखल करूनदेखील प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. यासंदर्भात कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- दयानंद इरकल
प्रदूषण नियंत्रणाबाबत प्रशासन
गंभीरपणे दखल कधी घेणार?
पुणे : पवना नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झालेली आहे. ती ताबडतोब काढणे गरजेचे असताना प्रशासन हातावर हात धरून कोणाची वाट पाहताहेत.. आशिया खंडातील श्रीमंत नगरपालिकाचे बिरूद मिरविणाऱ्या नगरपालिकेला हे भूषणावह नाही. नदी म्हणजे कचराकुंडी अशीच बहुतेकांची धारणा दिसते. मग ती मुळा, मुठा असो की पवना. येथे घाण, राडारोड्यासह सांडपाणी सर्रास सोडले जाते. त्यामुळे जलपर्णी वाढली आहे. या प्रदूषण नियंत्रणाबाबत प्रशासन गंभीरपणे दखल कधी घेणार..
- अजय
दर रविवार खेळण्यासाठी
मैदाने खुली करावीत.
पुणे : सरकारकडून "खेलेगा इंडिया.. तो बढेगा इंडिया'चे प्रोमोशन मोठ्या प्रमाणात होत आहे. मुले खेळतील तर निरोगी राहतील. ती मुले श्रीमंत, गरीब, शालेय किंवा शालाबाह्य असोत. त्यांच्यासाठी खेळ हा महत्त्वाचा विषय आहे. मात्र खेळण्यासाठी ग्राउंडच नसतील, तर मुले मोबाईलवरच खेळ खेळणार... सामाजिक कार्यकर्त्यांनी "सकाळ'च्या मदतीने पुढाकार घेत शहरातील काही मैदाने दर रविवार खेळण्यासाठी खुली करावीत.
- वंदना
दहावी, बारावीची परीक्षा म्हणजे
आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही !
पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. घराघरांत परीक्षामय वातावरण दिसत आहे. परीक्षेच्या काळात खऱ्या अर्थाने मुलांना गरज असते ती मानसिक आधाराची व योग्य संवादाची. काही विद्यार्थी परीक्षेचा ताण घेतात. मात्र दहावी, बारावीची परीक्षा ही आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही हे लक्षात घ्या. परीक्षेच्या काळात पालकांनी व मुलांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले कसे ठेवता येईल याचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार व आत्मविश्वासाने परीक्षेला जावे. रात्री पुरेशी झोप, सकस आहार, भरपूर पाणी पिऊन प्रथम आपले आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. कारण.. "आप भला तो सब भला.' वेळेचे नियोजन करा. परीक्षेच्या काळात कोणतीही काळजी करू नका. "चिंतासे चतुराई घटे..' हे संत कबीर यांचे वाक्य लक्षात ठेवा. सोबत असल्याचा दिलासा पालकांनी आपल्या मुलांना दिला पाहिजे.
- रोहिणी हेमाडे
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune