पुणे : सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्येच अस्वच्छता

किशोर मोगल 
Sunday, 12 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्येच अस्वच्छता
पुणे : महात्मा फुले पेठेतील अण्णा भाऊ साठेनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या वसाहतीमध्ये कचरा साठला आहे.  त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे.  हा भाग अद्यापही सफाई अभियानाच्या प्रतीक्षेत आहे.  तरी, महापालिकेच्या संबधित विभागाने लक्ष्य द्यावे. 

लक्ष्मीनगरमध्ये सर्रास वाहतूूकनियामांचे उल्लंघन 
पुणे : पुण्यात रस्त्यारस्त्यावर वाहनचालकांकडून दररोज क्षणोक्षणी सविनय कायदेभंग होत असतो. याचं उत्तम उदाहरण आपल्याला लक्ष्मीनगर येथील गजानन महाराज मंदिर चौकाजवळ पाहायला मिळते. या चौकात मिळणाऱ्या चार रस्त्यांपैकी तीन रस्त्यांवर तर ही कायदेभंगाची चळवळ जोरात चालते. शाहू कॉलेजकडून गजानन महाराज चौकाकडे यायला प्रवेश बंदी असूनही दत्तवाडी पोलिस ठाण्याकडून चौकाकडे सर्रास वाहतूक चालू असते. त्या रस्त्यावर असलेल्या चहा-नाश्‍त्याच्या टपऱ्यांवर विद्यार्थ्यांचे घोळके आपली वाहने आडवी लावून उभे असतात.

चौकात येणारा दुसरा रस्ता पर्वतीकडून येणारा आहे. या रस्त्यावर डाव्या-उजव्या दोन्ही बाजूला टेंपो, रिक्षा, दुचाक्‍या पार्क केलेल्या असतात. तिसरा रस्ता सारंग चौकाकडून येणारा आहे. या रस्त्यावर पदपथावर मोठी भाजी मंडई भरते व आधुनिक मावळे आपल्या घोड्यावर (दुचाकी/चारचाकी) बसूनच किंवा तिथेच मध्ये उभी करून खरेदी करत असतात. तिथून पुढे आल्यावर सारंग चौकात सारंग पोलिस चौकीच्या सभोवती तर हातगाड्या, टपऱ्या, दुचाक्‍या यांचा सकाळ-सायंकाळ विळखा पडलेला असतो. सर्वांतून तिन्ही रस्त्यांवरून वाहनचालक, बसचालक मोठ्या हिकमतीने गाडी लढवत असतात.

परिसरात दोन मोठी पोलिस ठाणी आहेत. एकेरी वाहतूक, नो पार्किंग, पदपथावर अतिक्रमणे हे व असे अनेक कायदे दिवसाढवळ्या मोडले जात असताना तेथील पोलिससुद्धा त्याकडे मायेने पाहत असतात. गजानन महाराज चौकात तर गेल्या दहा हजार वर्षांत (?) एकही वाहतूक पोलिस नजरेस पडला नाही. 
- जयंत जेस्ते 
 

कर्मचारी वसाहत समस्यांच्या विळख्यात 
पुणे : महापालिकेत नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील अनेक प्रश्नाची उत्तरे अनेक वर्षांपासून मिळालेली नाही. आतापर्यंत या वसाहतीतील इमारतीवर जो खर्च झाला आहे एवढ्या खर्चात नवीन इमारत उभी राहिली असती. आज या इमारतीचे छत ढासळत आहे. स्वच्छतागृहात अनेक समस्या निर्माण होतात. 200 ते 230 चौरस फुटाची घरे आहेत. त्यामुळे कर्मचारी वसाहतीतील कामगार आराम करू शकत नाहीत. इमारत कोसळून एखादी दुर्घटना घडेल, तेव्हा प्रशासन जागे होणार का? हा प्रश्न पडला आहे. 
- दयानंद इरकल 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC is ignoring uncleanliness at anna bhau sathe nagar in pune