
शहरातील कर्वेनगर परिसरात 'नो पार्किंग' चा बोर्ड नसतानाही काही गाड्या पोलिसांनी उचलण्याचा प्रकार घडला आहे.
पुणे : शहरातील कर्वेनगर परिसरात 'नो पार्किंग' चा बोर्ड नसतानाही काही गाड्या पोलिसांनी उचलण्याचा प्रकार घडला आहे. शाहू कॉलनीतील, लेन क्रमांक 1 येथे ही पोलिसांकडून अशाप्रकारची कारवाई करण्यात आली. 'नो पार्किंग' चा बोर्ड नसताना देखील अशा प्रकारची कारवाई पोलिसांकडून करण्यात आल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
या परिसरात पार्किंगचे मोजकेच फलक पाहायला मिळतात. शिवाय संबंधीत परिसरात राहणाऱ्यामध्ये विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हॉटेल आणि दुकाने सर्वाधिक आहेत. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण झालेल्या भागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार पोलिसांकडून करण्यात आला आहे.
रस्त्याच्या अरुंद लांबीमुळे या परिसरात रात्रीच्या वेळी वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. तेव्हा ट्राफिक पोलीस येत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
फोटोत दिसणारी दुचाकी पांढऱ्या रेषेच्या आत असून पोलिसांनी लॉक केलीये आणि रस्त्याच्या विरुद्ध दिशेला 2 कार रस्त्यापर्यंत पार्क केल्या असूनही काहीही कारवाई नाही! या कार जेथे पार्क केल्या आहेत ती कमिन्स कॉलेजची भिंत आहे. कॉलेजने या परिसराच्या 100 मीटरच्या अंतरावर पार्किंग करू नका असं बोर्ड पण लावलं आहे तरी ही पार्किंग कशी काय चालवून घेतली जाते?
लेन 1 च्या सुरवातीलाच उजव्या दिशेने जाणारा रस्ता. येथे No Parking असूनही रोज गाड्या लागतात. आजही पोलिस आले तेव्हाच्या या गाड्या. तरी इथे कारवाई का नाही? एकही गाडीला जामर नाही! अगदी पुसटशा शब्दात भिंतीवर No Parking लिहिलंय, त्यावरही पिवळ्या रंगाचा अर्धा कापड आलाय. साहजिक आहे की ते वाचल्या जाणार नाही.