पथदिवे नसल्यामुळे अपघाताची शक्यता

विक्रम गावडे
बुधवार, 30 मे 2018

भांडुप : पश्चिम (वॉर्ड न. ११२) सरदार प्रताप सिंग संकुलाच्या प्रवेश द्वारा पासून आत संकुलाच्या रस्त्यांवर गेले कित्येक वर्ष पथ दिवे नाही आहेत. संकुलातील ह्या रस्त्याची गेली कित्त्येक वर्ष डागडुजीच झाली नाही आहे. खड्यांमुळे ह्या ठिकाणी रहिवाश्यांना चालणे कठीण झाले आहे. त्यात हा रस्ता उंचसखल झाला आहे. किरकोळ अपघातांची संख्या वाढत आहे.

रात्रीच्या वेळी खड्यांमधून वयस्कर व्यक्तींना चालणे म्हणजे जिगरीचे झाले आहे. नेते मंडळी मतं मागायला येतात आश्वासनं देतात कि आम्ही रस्ता आणि दिव्यांची सुविधा देवु पण अजून हि ह्यावर काहीही उपाय योजना झालेली नाही. रिक्षा पण ह्या संकुलात खराब रस्ता असल्याने येत नाहीत. पावसाआधी हा रोड होणं गरजेचं आहे. पावसात ह्या रस्तावरुन लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिकांना चालणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं होणार आहे. एखादा जीवघेणा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कुणाला धरावे ? ?

Web Title: possibility of an accident due to no street light