मॉडर्न शाळेत 90 प्रयोगांचे सादरीकरण 

सकाळ संवाद
Sunday, 1 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

मॉडर्न शाळेत 90 प्रयोगांचे सादरीकरण 

वारजे ः प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी 90 प्रयोग सादर केले. या वेळी विद्यार्थ्यांनी पाण्याचा पुनर्वापर, हवेचा दाब, प्रकाशीय किरणे, शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर बहुविध प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशालेचे मुख्याध्यापक गोकूळ कांबळे, येळवंडे यांनी प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. विज्ञान शिक्षिका मनीषा कांबळे, योगेश टेकाळे, वैदेही शेटे, दीपक कदम यांनी आयोजन केले होते. 
- दीपक कदम 

Image may contain: 9 people, people sitting and indoor

रस्त्याच्या कामात मनमानी कारभार 
सुखसागरनगर ः डाके चौक ते लेक टाऊन पादचारी मार्ग येथील रस्ता सुस्थितीत असताना सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा रस्ता करून महापालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी काय साध्य करणार आहेत; स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता अधिकारी उधळपट्टी व मनमानी करत आहेत. 
- राज अंबिके 

Image may contain: car and outdoor

कात्रजमधील रस्ता दुरुस्तीचे 
काम लवकर पूर्ण करावे 

कात्रज ः येथील परिसरात धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात रस्ता दुरुस्ती, चेंबर दुरुस्तीची कामे बऱ्याच दिवसांपासून चालू आहेत. ही कामे परिसरासाठी चांगलीच आहेत; परंतु ती संबंधितांनी लवकरात लवकर पूर्ण करावी. 
- विकास गुरव 

हुतात्मा चौकातील अतिक्रमणांमध्ये वाढ 
बुधवार पेठ ः हुतात्मा चौक येथील मजूर अड्ड्याजवळ शीतपेय व फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी हुतात्मा स्मारकाची माहिती देणारे फलक नाही तसेच ही जागा मजुरांसाठी आहे; पण या जागेत मजुरांऐवजी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले आहे. पुणे महापालिकेने या जागेवर मजुरांसाठी उपाययोजना कराव्यात. तसेच या जागेतील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे. 
-विजय जगताप 

Image may contain: 1 person, shoes, tree and outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Presentation of 90 experiments in Modern School