नाला अडविल्यामुळे नागरिकांची गैरसोय 

सुधा बबन वीर
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

धनकवडी : येथील जवाहर बेकरीजवळील नाला अडविण्यात आला आहे. त्यामुळे सांडपाणी वाहण्यास अडथळा निर्माण होतो. याचा नाहक त्रास येथील रहिवासी अनेक वर्षे सहन करत आहेत. हा नाला कशासाठी अडवलाय, हेच समजत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, त्यामुळे आजारांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महापालिकेत तक्रार करूनही कोणी याकडे लक्ष देत नाही. यावर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास सर्व रहिवासी आंदोलन करणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: problem to citizens due to blocking the drainage