कचऱ्याचा प्रश्न सुटला पण भटक्या कुत्र्यांचा नाही.

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पर्वती : शिवदर्शन येथील भटक्या कुत्र्यांचा येथील रहिवाशांना फार त्रास होतो आहे. देवी मंदिर आवार व बागूल उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांना याचा 'प्रसाद' मिळाला आहे. सकाळ संवादच्या माध्यमातून शिवदर्शन येथील कचऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सोडवला गेला आहे. तशीच कारवाई मनपा सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाने करणे अपेक्षित आहे. येथील भटक्या कुत्र्यांवर यापूर्वीही वारंवार तक्रारी करून नसबंदी करण्याचे फक्त दिखाऊ काम करू नये एवढीच अपेक्षा आहे.