रायकर मळ्यातील रस्त्याची दुरावस्था

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : धायरी गांवातील रायकर मळा भागात, हाफश्या जवळच्या तसच देशमाने क्लिनीकला लागुन असलेल्या गल्लीतल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत, तर पावसाचे पाणीही त्यामध्ये साठलेले आहे. यामुळे येथील डासांचे प्रमाण वाढले आहे. तात्पुरती गरज भागवण्यासाठी या रस्त्यावर खडी टाकण्यात आली होती. ज्याने या रस्त्याची अवस्था अजुन वाईट झाली आहे. तेथील रहिवाशांना याचा खुप त्रास होतो. या रस्त्यावरून चालताना प्रचंड कसरत होते. तसच दुचाकी गाडी गल्लीत आणणे मनस्ताप देणारं आहे.

Image may contain: plant and outdoor

याकडे कोणीच लक्ष देत नसुन, येथील नागरिकांची समस्या गेले काही वर्ष तशीच आहे. तरी येथील स्थानिक लोकप्रतिनीधींनी याची दखल घ्यावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raiker Mala road in bad condition