#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
खडकवासला धरणाची सीमाभिंत दुरुस्त करावी
खडकवासला : खडकवासला धरण परिसरातील सीमाभिंतीच्या कठड्याला भगदाड पडले आहे. येथे पर्यटकांची वर्दळ सतत असते. रात्री ते दिसले नाही तर मोठा अपघात घडू शकतो. तरी संबंधित विभागाने भिंत दुरुस्त करावी.
- विजय जगताप
चलन हाताळावे सांभाळूनच
कोथरूड : भारतीय चलनात असलेल्या नवीन व जुन्या नोटा तसेच नाणी फारच जीर्ण किंवा झिजली आहेत. नागरिक ही चलने चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याने त्या बाद होतात. चलनी नाणी धार्मिक विधीसाठी वापरली जातात, तसेच पाण्यात फेकली जातात. त्यामुळे नाण्याचा मूळ रंग बदलून त्यावरील किंमतीचा आकडाही झिजतो. 2018 मधील पन्नास रुपयांची नोट न पाहता हाताळली तर पाच रुपये समजून दिली जाते. इतका रंग व आकारात साम्य आहे. दोनशे व दोन हजार रुपयांच्या नोटांबद्दल हाच गोंधळ उडतो. जुने पन्नास पैशांचे नाणे आणि 2013, 2014, 2015 मधील एक रुपयात खूप साम्य आहे, त्यामुळे दुकानदार चलाखीने ग्राहकांना फसवतोच. मध्यंतरी दहा रुपयांची नाणी कोणी स्वीकारतच नव्हते, त्याबद्दल मार्गदर्शन व्हावे. रौप्य नाणीवरील आकडे खूपच झिजली आहेत. त्यामुळे एक, दोन, पाच रुपयांचा व्यवहार करताना दक्षता बाळगावी लागतेच.
- नीलम सांगलीकर