कमला नेहरू उद्यानाची दुरवस्था 

सकाळ संवाद
Friday, 31 January 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

कमला नेहरू उद्यानाची दुरवस्था 
प्रभात रस्ता : शहरातील प्रभात रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील बाग म्हणून कमला नेहरू उद्यानाची ओळख आहे; परंतु सध्या ठिकठिकाणी सार्वजनिक बागा विकासकामांसाठी खोदून ठेवण्यात येत असल्यामुळे नागरिकांना व्यायामासाठी व फिरण्यासाठी त्यांचा वापर करता येत नाही. ही कामे किती दिवस चालणार आहेत? नेमके कोणते काम केले जाणार आहे? किती खर्च येणार आहे? ठेकेदार कोण आहे? कामाचा कालावधी किती आहे? याचा उल्लेख व माहिती असलेला फलक लावलेला नसतो. असाच प्रकार कमला नेहरू उद्यानात सुरू आहे. जॉगिंग ट्रॅक खोदून ठेवल्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. हे काम कोणत्या लोकप्रतिनिधीच्या निधीतून सुरू आहे! याचाही उल्लेख नाही. बागेच्या दारातील गटारांच्या जाळ्या तुटलेल्या व खचलेल्या असल्यामुळे कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडू शकतो. याची महापालिका आयुक्त व उद्यान विभागाने दखल घ्यावी. 
- अनिल अगावणे

 

Image may contain: one or more people, tree and outdoor

स्मार्ट सिटीतील कचरा पेट्यांमधील कचरा उचला 
औंध : स्मार्ट सिटी योजने अंतर्गत परिहार चौक परिसरात नव्याने पदपथाचे नूतनीकरण करण्यात आले. यामुळे या परिसराला स्मार्ट वैभव प्राप्त झाले. नागरिकांना कचरा टाकण्यासाठी या पदपथावर प्लॅस्टिकच्या तकलादू कचरा पेटी बसविण्यात आल्या आहेत. या पेट्यातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने तसेच या पेट्यांचे दरवाजे सहजासहजी उघडे पडत असल्याने पेटीतील कचरा पदपथावर पसरला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच या कचरापेटीजवळ भटकी कुत्री वावरत असल्याने येथे नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करावी. स्वच्छ सर्वेक्षण हे केवळ स्पर्धेपुरते न ठेवता कायमस्वरूपी उपाययोजना करा. 
-नितीन राजे 
 

आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा 
कात्रज : कात्रज बायपास रस्त्यावरून आंबेगाव पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज कचरा टाकला जात आहे. याठिकाणी जवळच प्राइड इंग्लिश स्कूल आहे व नुकतेच नवीन झालेले स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. महापालिकेने लवकर कारवाई करावी. 
- संजय पासलकर 

 

जीत मैदानावरील साहित्याची दुरवस्था 
कोथरूड : कोथरूडमधील लोकमान्य कॉलनीतील जीत मैदानावर असलेल्या व्यायामाच्या आणि लहान मुलांना खेळण्याच्या साहित्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना अपघात होण्याची शक्‍यता आहे. तसेच ज्येष्ठांना व्यायामाला मुकावे लागत आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि या साहित्याची दुरुस्ती करावी. 
-आनंद कांबळे 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair of the Kamala Nehru Park