कोंढवा बुद्रुक येथील रस्ता दुरूस्ती करावा 

सकाळ संवाद
Monday, 23 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

स नंबर 50 लेन नंबर1 कोंढवा बुद्रुक रस्ता दुरूस्ती करावा 
गोकुलम सोसायटी ते बरसाना इनक्‍लेव सोसायटी पर्यंतचा रस्ता पाईपलाईन व ड्रिनेजसाठी गेल्या चार महिन्यापूर्वी खोदला होता, आता काम संपून तीन महीने झाले आहेत तरी आजतागायत रस्ता रहदारीयोग्य करण्यात आला नाही. याकडे संबंधित यंत्रना केव्हा लक्ष देणार?. 
56/6/2, केदारेश्वर वस्ती, टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक, पुणे 
-बबन भोसले 

Image may contain: shoes and outdoor

कात्रज : मी व माझ्या कुटुंबाने जनताकर्फ्युचे पालन केले. सकाळी सर्वांनी लवकर उठुन घरातच योग प्राणायाम केले. दिवसभर घरकाम, पुस्तक वाचन, वेब सिरिज व बातम्या पहाणे, गेलरीतील झाडांची देखभाल, घरातील स्वच्छता केली. भरपूर फलआहार देखिल केला.जेवना नंतर दुपारी पुरेशी झोप घेत सांयकाळी चहा घेत सर्वांनी मिळून गप्पागोष्टी केल्या, नातलगांसोबत फोनवरुन संभाषण इत्यादी गोष्टी केल्या. दिवाळी अंक मधिल निवडक लेख मी पुन्हा एकदा वाचले .वडिलांनी लॉक ग्रिफीन कादंबरी वाचयला घेतली. माझी पत्नी भाग्यश्री व आई यांनी विविध रेसिपीज दिवसभरात केल्या.सायंकाळी पाच वाजता गेलरी मधे जावून आम्ही टाळी व थाली वादन करत करोना रोखण्यासाठी तत्काल सेवा देनारया बांधवांचे आभार देखील मानले. मोदीजींच्या कर्फ्यू आदेशामुळे बाहेर न जाता करोनाचे संकट रोखण्यासोबतच आम्ही कुटुंबीय एकमेकांसोबत छान वेळ घालवला. हे केवळ 22मार्च पुरते न करता पुढ़ील सूचना मिळेपर्यंत काही दिवस आम्ही कुटुंबीय घरा बाहेर पडनार नाहीये. 
-अक्षय बनकर

 

ओढयातील आवाजा बाबत 
चव्हाण नगर धनकवडी तीन हत्ती चौक येथील ओढ्यामध्ये ड्रनेज चे पाणी सोडण्यात आल्यामुळे अनेक महिन्यांपासन त्याच्या आवाजाचा आणि वासाचा जवळच्या सोसायटी मधील नागरिकांना त्याचा त्रास महापालिकेला तक्रार करून देखील त्यावर ठोस उपाययोजना झाली नाही. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहतो.. 
-परेश निगडे 
 

 

मुलांनी थोडे दिवस खेळ खेळू नये
हडपसर मधील आज मेडिकल दुकाने सोडून पोलीस खात्याने सगळे दुकाने बंद केली परंतु ग्लायडींग सेंटर च्या मैदानावर मात्र क्रिकेट, फुटबॉल वैगरे सर्रास पणे कुठलीही भीती न बाळगता खेळ चालू याचा याचा मुलांनी विचार करून थोडे दिवस खेळ खेळू नये, आपली काळजी आपणच घ्यायला हवी. 
-अशोक दामोदर जाधव 

 

Image result for मैदानावर खेळणारी मुले चित्र esakal

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair the road at Kondhwa Budruk