महिलांसोबत बस स्टॉप वर काय होतंय पहा  

सकाळ संवाद
Friday, 28 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune

वखार महामंडळ येथील 
बस्टॉपची शेड उभारावी
 
सॅलिसबरी पार्क : येथील प्रभाग क्र. 28 वखार महामंडळ येथील बस्टॉपचे शेड काढण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे गुलटेकडी परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना उन्हात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने येथे शेड उभरावी 
- योगेश पवार 

Image may contain: 2 people, motorcycle and outdoor

 

धायरीत कचऱ्याची समस्या गंभीर 

धायरी : डीएसके धायरी रस्त्यालगत असलेल्या सोसायटीसमोर कचरा टाकला जातो. तो नियमित उचलला जात नाही. पालिकेचे स्वच्छता कर्मचारीसुद्धा येथे फिरकत नाहीत. रोज येथे घंटागाडी आल्यास ही समस्या दूर होईल. 
- विनायक लावलेकर 

 

Image may contain: tree, plant, outdoor and nature

मराठी शाळेची पटसंख्या वाढविण्याची आवश्‍यकता 

कुडजे : कुडजे गावातील माझी मराठी शाळा 1920 साली सुरू झाली. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी या शाळेत शिकून बाहेर पडले आहेत. गावापासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या माळरानावर ही शाळा आहे. शाळेच्या कडेला झाडे असल्याने दिवसभर पक्ष्यांचीसुद्धा शाळा भरते. ती रानात असल्याने मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गाचे धडे आपोआप मिळतात. तसेच, पावसाळ्यात खूप पाऊस पडल्यावर ओढ्याला पूर येतो. तेव्हा मुले त्या पाण्यातून खेळत खेळत घरी येतात. तसेच, मुले कागदाची नाव करून त्या वाहत्या पाण्यात सोडतात. उन्हाळ्यात शाळेसमोरील झुडपात चिमुकले घर करतात. अशी आमची शाळा मुलांना शिकवता शिकवता खूप आनंदसुद्धा देते. सध्या शाळेच्या मुख्याध्यापिका धावडे आहेत. तसेच मंगल पायगुडे, गीता सारुख, जयमाला दरेकर, या सहशिक्षिका आहेत. इंग्रजी माध्यम शाळांमुळे माझ्या शाळेची पटसंख्या खूप कमी झाली आहे. त्यामुळे जीवनातल्या ह्या खऱ्या आनंदापासून बरीच मुले लांब आहेत. आता शाळेला रेल्वेगाडीचा लूक देण्यात आला आहे. तसेच, या रेल्वेचा प्रवास अक्षरशः मोफत आहे. तरीसुद्धा यात बसायला मुलेच नाहीयेत, याचे मला दुःख वाटते आहे. तसेच, ही रेल्वे कायमची थांबते की काय, याची भीती वाटते. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
- दत्ता पायगुडे 
 

नॅन्सी लेक होम्सजवळ मुक्त जनावरांचा संचार 
भारती विद्यापीठ : येथील नॅन्सी लेक होम्सजवळ जाताना उतारावर कचऱ्याचे ढीग साठले आहेत. तेथे डुकरांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे रोगराईला आमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती आहे. एकतर उतार असल्यामुळे तिथून गाडीवर जाताना खूपच काळजीपूर्वक जावे लागते आणि अशा परिस्थितीत मुक्त जनावरे तिथून आडवी येतात. प्रशासनाने यावर उपाययोजना करावी. 
-सुचेता उजनकर 
 

 
वर्तक बागेतील ध्वनिप्रक्षेपक बंद 
शनिवार पेठ : वर्तक बागेत बसवलेले ध्वनिप्रक्षेपक गेले एक वर्षांपासून बंद आहेत. आता नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात बागांसाठी 101 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तरी बागेतील ध्वनिप्रक्षेपक चालू करावे. त्यामुळे बागेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना विरंगुळा मिळेल. 
-अजय अंधारे 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See what's happening at women's bus stops