शिरुर- पाण्याअभावी शेतीपिके जळण्याच्या मार्गावर

महेश नाईक
सोमवार, 14 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शिरुरः निमोणे परिसरातील जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने शेती पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. येथील विहिरींतील पाण्याने तळ गाठला आहे तर, काही ठिकाणी विहिरींचे पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. घोड नदीकाठच्या गावांच्या विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे ऊस टोमॅटो, भुईमूग ही नगदी पिके व जनावरांचा चारा मका, गवत जळण्याच्या मार्गावर आहेत. मान्सूनचा पाऊस वेळेवर आला तर ही पिके थोड्याफार प्रमाणात जगू शकतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याने आता सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागले आहे. 
 

Web Title: shirur taluka crops issue because of lack of Water