आयडियल शाळेत शिवजयंती उत्साहात

सकाळ संवाद
Monday, 24 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

आयडियल शाळेत शिवजयंती उत्साहात 

धायरी : धायरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयडियल पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. मुलांनी शिवरायांच्या जयघोषात भैरवनाथ मंदिरापर्यंत फेरी काढली. नृत्य, भाषणे, पोवाड्याचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमासाठी गुरुकुल ऍकॅडमीचे संस्थापक गोरे, संस्थेचे अध्यक्ष गोडसे, संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका गायकवाड उपस्थित होते. हा सोहळा शिक्षक, विद्यार्थी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांच्या सहकार्याने मोठ्या उत्सवात पार पाडला. 
- मारुती निधान 
62259 

 

कालवा रस्त्यावर जाळला जातोय कचरा 

कोथरूड ः कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा जाळला जातो. कचरा जाळण्यास बंदी असतानाही शहरात जागोजागी असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच नागरिकांना धुराचाही त्रास होत आहे. अनेकवेळा महापालिकेचे कर्मचारी झाडांचा पालापाचोळा गोळा करून जाळतात. सोसायट्यांमधूनही कचरा जाळला जातो. हे प्रकार थांबायला हवेत. महापालिकेने तातडीने पाहणी करून याची दखल घ्यावी व संबंधितांवर कारवाई करावी. 
- शिवाजी पठारे 

Image may contain: outdoor

 

धायरीत पदपथांवर अतिक्रमण 
धायरी : धायरीतील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे येथे नेहमी कोंडी होत असते. यात काही ठिकाणी मोठे पदपथ बांधलेले आहेत. पण हे पदपथ कुणासाठी आहेत? दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांच्या सोयीसाठीच ते केले आहेत का? त्यांच्या या अतिक्रमणांमुळे पादचारी रस्त्यावरूनच चालतो आणि यामुळे गर्दीत अजूनच भर पडते. या लोकांवर कारवाई का होत नाहीये? महापालिकेने कारवाई करावी. 
- अश्विनी देशपांडे 
 

श्रीराम संकुल शेजारी वाहतेय दूषित पाणी 
धायरी ः गल्ली क्रमांक 20 (अ) श्रीराम संकुल शेजारी ड्रेनेज ओसंडून वाहत आहे. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी व डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी. 
- महेश पोकळे 

वारजे - माळवाडी ः येथील राष्ट्रसेवा समूहाने (योद्धा जिम) शिवजयंती सोहळा साजरा केला. यानिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी आकर्षक शिवमहालची प्रतिकृती तयार केली होती. यावरील विद्युत रोषणाई शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. 
- विक्की मानकर 

 

सेंट झेवियर शाळेत विद्यार्थ्यांना मागदर्शन 

सिंहगड रस्ता ः विठ्ठलवाडी येथील सेंट झेवियर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा व त्यांची शौर्य गाथा ही नाटकाच्या रूपात सादर केली. अविता राज यांनी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली व विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. या वेळी शाळेतील शिक्षिका अमृता जोशी, वर्षा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थी गायत्री सोनकवडे, सारा चव्हाण, खुशी माळी, वेदिका जाधव, अवनी ढमढेरे, स्नेहल लांडे, मृण्मयी वैद्य, ईश्वरी खलाटे, श्रीशा दडीकर, मृनाली वराडे, गार्गी आचार्य, आरोही ढमढेरे, श्री गडकरी, ईश्वरी येल्लापुरकर, श्रेष्ठा पायगुडे, तनिषा शाह, अनुष्का फाळके, आर्या मोरे, गार्गी पेडणेकर, अवनिश पवार, विराज अंबाले, अनुज शेखावत, मानस शिंदे, अर्मथ्य,शौर्य देशमुख, अर्नव प्रधान, ओजस पवार, विष्णू कुलकर्णी, राघव शेखावत, रिहांश जोशी, ओम शर्मा, श्रिहांस सोनावणे, युग बावले, आयुष गोसावी, राजेश्वर बोरकर आदी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. 
- प्रेरणा सोनकवडे 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti cheers at the Ideal School