निगडी ते वाघोली मार्गावर तेजस्विनी बस चालू करावी

एक नागरिक
गुरुवार, 14 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुण्यात महिलांसाठी तेजस्विनी बसचा चांगला उपक्रम राबविला आहेत. बस क्रमांक ३३६ भक्ती शक्ती, निगडी ते केसनंद फाटा, वाघोली पर्यंत तेजस्विनी बस (महिलांसाठी) लवकरात लवकर चालू करावी. कारण निगडी, पिंपरी चिंचवड, खडकी, येरवडा येथे राहणाऱ्या हजारो मुली व महिला रामवाडी जकात नाका, विमान नगर, चंदनगर येथे काम करतात. ह्या मार्गवर फक्त ३३६ क्रमांकची एकच बस आहे. त्यामुळे सकाळी ०९:०० ते ०१:०० वाजेपर्यंत व सायंकाळी ०५:०० ते ०९:३० पर्यंत खूप गर्दी असते. यावेळी मुली व महिलांची संख्या जास्त प्रमाणात असते. त्यामध्ये गरोदर महिला सुध्दा असतात. म्हणून पीएमपीएलला विनंती आहे की त्यांनी ह्या मार्गावर तेजस्विनी बस चालू करावी ही नम्र विनंती.

Web Title: should start the tejaswini bus on the wagholi road