#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
भैरवनाथ विठ्ठल मंदिरामध्ये फवारणी
खडकवासला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी खडकवासला येथील भैरवनाथ विठ्ठल मंदिरामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. पानफूल उत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. तसेच सर्व भाविकांनी दर्शनासाठी एकाच वेळी गर्दी करू नये, टप्प्याटप्प्याने दिवसभर आपल्या सोयीनुसार दर्शनासाठी यावे असे आवाहन भैरवनाथ विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
- विजय मते
धोकादायक पत्रे काढले
सिंहगड रस्ता : माणिकबागेतील पदपथावर धोकादायक पत्रे या आशयाचे वृत्त सकाळ संवादमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची महापालिकेने दखल घेऊन ते सुस्थितीत लावले आहेत. त्यामुळे "सकाळ'चे आभार. तसेच सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या एका सार्वजनिक वाचनालयाचे काम पूर्ण झाले आहे. याच जागेवर आधी एक दिशादर्शक फलक लावलेला होता. हा फलक पदपथ दुरुस्तीच्या वेळी काढला होता. आता या वाचनालयाच्या कामाच्या वेळी तो अल्पखर्चात पूर्ववत लावता आला असता पण संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. भविष्यात तरी अशा बाबींकडे पालिका प्रशासनाचे लक्ष जाईल हीच अभिलाषा.
- संस्कृती तोरकडी
डहाणूकर कॉलनी : डहाणूकर कॉलनी येथील बस स्थानकासमोर दररोज दुचाकी लावल्या जातात. त्यामुळे नागरिकांना बस पकडताना अडचणी येत आहेत.
-कृष्णा