#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
नऱ्हे : नऱ्हे धायरी रस्त्यावर सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र, येथे सूचना फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड आदींचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायत अधिकारी एखादा अपघात होण्याची जणू वाट पाहत असल्याचे वाटते.
- सचिन जाधव
कर्वे रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू करा
एरंडवणे : एसएनडीटी कॉलेज ते आठवले चौक रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. डेक्कनकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना सक्तीने आठवले चौकात यावे लागते. एसएनडीटी ते नळस्टॉप चौकापर्यंत पुन्हा दुहेरी वाहतूक करावी. यामुळे आठवले चौकात वाहनांची कोंडी होणार नाही. मोठा वळसा, पेट्रोल व वेळ वाचेल.
- हेमंत भालेराव
यशोदीपमध्ये होम मिनिस्टर व बालआनंद मेळावा
वारजे माळवाडी : यशोदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होम मिनिस्टर व शैला माळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा आयोजित केला होता. या वेळी संस्थापक रतन माळी, सुविधा नाईक, सचिन दांगट, कमल गरुड, मुख्याध्यापिका गीता गुंजीकर, प्रभारी मुख्याध्यापक व्यंकटेश देशमुख, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका आसावरी मुजुमदार उपस्थित होते. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत तिजारे यांनी केले.
- व्यंकटेश देशमुख