#WeCareForPune  बस थाब्यांचे शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

शिवाजीनगर : महापालिका भवन येथून पीएमटीच्या बस मोठया प्रमाणात शिवाजी पुतळ्यासमोरील बस थाब्यांवरून जातात. या बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे. पहिला बस थांबा मागे होता त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने तो बस थांबा पोलिसांनी पुढे हलविला. त्याठिकाणी ऑईलचे दुकानं असल्याने रिक्षा आडव्या तिडव्या उभ्या राहतात बस थाब्याजवळ बस व्यवस्थित थांबत नाहीत.

सध्या कडक उन्हाळयाचे दिवस चालु आहेत. अशा बस थाब्यांला शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेकरी मुले, लहान मुले, अपंग-दिव्यांग बांधव, आजारी माणसे, वृद्ध जेष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बस थांब्यावर प्रशासनाने योग्य दखल घेऊन लवकरात लवकर शेड उभारावे
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sumil shinde writes about shivajinagar bus shade