व्हॅलेंटाइन डे निमित्ताने...

सुनेत्रा विजय जोशी 
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

प्रेम हे आईवडिलांवर असेल तर त्यांनाही आय लव यु म्हणुन त्याच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली, तर त्यांनाही आनंदच होईल. मित्र मैत्रिणी असतील किंवा बहीण भाऊ असेल,  त्यांनाही मोकळेपणानी तुम्हाला ते आवडतात. हे सांगायचच राहुन गेल असेल, तर ते ही आज सांगुन टाका.

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यावर सगळ्यांचा इतका आक्षेप का असावा हेच कळत नाही. आपल्याकडे एकत्र कुटुंब तसेच पध्दत, संकुचित विचार या मुळे आधीच प्रेम व्यक्त करायला वाव नसतो. काय हरकत आहे एखादे दिवशी तरी मनातले प्रेम व्यक्त करायला. तसेही आपण चांगले काम करायला मुहूर्त बघतोच की.. मग हा प्रेम व्यक्त करण्यासाठी मुहूर्त समजुया. 

काहीजणांचा विरोध तर हे पाश्चात्य अनुकरण म्हणुन असतो. पण मी म्हणते असेल एखादी दुसऱ्याची चांगली गोष्ट अनुकरण करायला काय हरकत आहे. आपल्या देशातील ज्या पध्दती त्यांना आवडतात त्या ते देखिल आनंदाने  स्विकारतातच की.

प्रेम हे आईवडिलांवर असेल तर त्यांनाही आय लव यु म्हणुन त्याच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली, तर त्यांनाही आनंदच होईल. मित्र मैत्रिणी असतील किंवा बहीण भाऊ असेल,  त्यांनाही मोकळेपणानी तुम्हाला ते आवडतात. हे सांगायचच राहुन गेल असेल, तर ते ही आज सांगुन टाका. अगदी परमेश्वराला सुद्धा छानसा गुलाब वाहुन देवा, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे. असाच माझ्यासोबत रहा, असेही बिनधास्त सांगा. हो जिच्या वर किंवा ज्याचा वर तुमचे प्रियकर म्हणुन प्रेम असेल त्या व्यक्तीला देखिल. फक्त त्याचा विपऱ्यास होणार नाही याची काळजी घ्या. आणि हो तुमचे प्रेम जर कुणी स्विकारले नाही तरी नाराज अजिबात होऊ नका. प्रत्येकाची आवड वेगळी असते. कदाचित समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडता पण त्या नात्याने नाही इतकाच त्याचा अर्थ असु शकतो. 

अगदी रोज तुमच्या घरी कामाला येऊन तुमची काळजी घेणाऱ्या कामवालीला पण सांगुन बघा. बाई ग, तु आहेस म्हणुन मला नोकरी करणे जमतय. ती पण खुश होऊन नव्या हुरूपाने काम करेल. आपण कुणाला तरी आवडतो, हे कळणे प्रत्येकाला खुप उर्जा देत जगण्यासाठी. 

गुलाब प्रेमाचा प्रतिक म्हणुन देतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याची आवडती गोष्ट किंवा गरजेची वस्तू देऊनही ती व्यक्ती आपल्यासाठी स्पेशल आहे हे सांगु शकता. तेव्हा व्हॅलेंटाइन डे जरूर साजरा करा. आणि तुम्हाला आवडणाऱ्य़ा व्यक्तीला ते जरूर कळु द्या. सगळ्या वाचकांना देखिल व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा.

शेवटी इतकच म्हणेन "खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे". 
 

Web Title: Sunetra Vijay Joshi article

टॅग्स