कोरोनाचे दहन... 

सकाळ संवाद
Wednesday, 11 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सिल्वर इस्टेट सोसायटीत 
कोरोनाचे प्रतिकात्मक दहन 

बिबवेवाडी : सिल्वर इस्टेट सोसायटी येथे कोरोना व्हायरसचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी होलिका मातेचे पूजन केले आणि जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊन सर्वांना सुख शांति आणि सुख मिळावे अशी प्रार्थना केली. 
-प्रमोद नागवडे

Image may contain: 1 person, fire

जय अंबामाता संस्थेतर्फे 
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा कार्यक्रम 

शुक्रवार पेठ :  जय अंबामाता संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलगी वाचवा, मुलगी शिकवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंगल अनिल नागुल, स्वप्ना विशाल वारुळे, राजश्री सोनटक्के, कांचन मारोटी आणि नम्रता सागर नागुल उपस्थित होते 
-मंगल नागूल 

बिबवेवाडीत स्वामी विवेकानंद रस्त्याचे काम चालू आहे. परंतु गणेश स्वीटसमोर रस्ता दुभाजकात दोन फूट उंचीची भिंत बांधली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्ता ओलांडता येत नाही. आणि समोरच बस स्टॉप असल्याने, नागरिकांची गैरसोय होत आहे. 
-दिलीप खापरे 

पंडिता रमाबाई रस्त्यावरील चेंबर खचले 
नाना पेठ ः पंडिता रमाबाई रस्त्यावरील एचडीएफसी बॅंकेसमोरील कावेरी आपार्टमेंटच्या जवळ चेंबर खचले आहे. या मार्गावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. महात्मा फुले शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे. रात्रीच्या अंधारात हे खचलेले धोकादायक चेंबर वाहनचालकाला दिसले नाही तर अपघात होऊ शकतो. महापालिकेच्या संबंधीत विभागाने लवकरात लवकर दखल घ्यावी. 
- विजय जगताप Image may contain: outdoor

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The symbolic combustion of the corona