#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
सुटीत घ्या आरोग्याची काळजी
पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव व वाढणाणाऱ्या रुग्णांची संख्या या मुळे 'Prevention is better than cure' या इंग्रजी उक्तीनुसार सरकारने सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. तेव्हा पालक व मुलांनी घराबाहेर न पडता आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन घरातील साफसफाई करून घरच्यांना मदत करावी. तेव्हा सुटीत आरोग्याची खूप काळजी घ्या. हॅंडवॉशने हात धुवा. व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, स्वच्छता राखा व
घराबाहेर पडू नका.
- रोहिणी हेमाडे
मोरेबागचे रहिवासी डासांमुळे त्रस्त
कात्रज : मोरे बाग परिसरातील रहिवाशांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संध्याकाळी घराची दारे, खिडक्या बंद करून घ्यावी लागतात. वाहन चालवतानाही डास नाकातोंडात जातात. कृपया पालिकेने यात लक्ष घालावे.
- प्रभाकर भोसले
सामाजिक भान राखावे
पुणे : कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींनी सामाजिक भान राखण्याची गरज आहे. लागण झाल्यानंतर उपचार करून घेण्याऐवजी नागपूर येथील रुग्णालयातून पळ काढल्याचे वाचनात आले. परंतु, अशा पलायनामुळे इतरांना लागण होऊ शकते. ही बाब समाजासाठी धोकादायक आहे. पुण्यातून लागण झालेल्या व्यक्ती तपासणी न करता हिंगोलीसारख्या कमी सुविधा असलेल्या ठिकाणी जातो. आपल्यामुळे निरोगी व्यक्ती बाधित होऊ शकतात. एवढा साधा विचारही ते करू शकत नाहीत. ही बाब चीड आणणारी आहे. सरकार प्रतिबंधात्मक उपाय युद्धपातळीवरून करत आहे. अशा पळपुट्यांना सुशिक्षित कसे म्हणावे. खरे तर हा मोठा अपराध ठरवावयास हवा.
- पंजाबराव देशमुख