चिंचांची काळाप्रमाणे कमी होतेय क्रेझ

सकाळ संवाद
Thursday, 19 March 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

चिंचांची काळाप्रमाणे कमी होतेय क्रेझ 
कुडजे : खडकवासला जवळील आमच्या कुडजे गावामध्ये पूर्वी आंबे, बोरं आणि चिंचांना खूप महत्त्व होते. बदलत्या काळानुसार चिंचेच्या झाडाकडे कोणी बघत देखील नाहीये. गावातील अप्पा मांजरे आणि शरद पायगुडे यांच्या झाडाच्या चिंचा खूप गोड आहेत. त्यामुळे पूर्वी शाळेतील मुले दुपारच्या सुट्टीत आणि सुट्टीच्या दिवशीही चिंचा चोरण्यासाठी विविध युक्‍त्या करत असत. त्या वेळी पायगुडे दिवसभर झाडाखाली डोळ्यात तेल घालून चिंचांची राखण करत असत. आता मात्र उलटे चित्र दिसते. झाडाला यंदा खूप चिंचा लागल्या असून देखील या झाडाला पहारा सुद्धा नसतो. तरीपण गावातील मुले झाडाकडे फिरकतसुद्धा नाहीत, याचे खूप दुःख वाटते. 
- दत्ता पायगुडे 

Image may contain: tree, plant, outdoor and nature

पौड, मुळशी भागात बस सेवा सुरू करा 
कोथरूड : पौड मुळशीसाठी स्वारगेटहून पौड गाव, घोटावडे, चाले, उरावडे आणि मारणेवाडीसाठी ठरावीक वेळाने पीएमपीच्या बस आहेत. मात्र याच बरोबर जर काही बसेस कोथरूड डेपो ते वरील गांवासाठी सोडून शटल सेवा चालू केल्यास या भागातील शेतकरी, कामगार वर्गाची वाहतुकीची चांगली सोय होईल आणि त्यामुळे इतर गाड्यांची वाहतूकही कमी होईल. परिणामी, वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. 
-दत्तात्रय जाधव 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tamarind intake was low