#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
पर्वती गाव परिसरात कुत्र्यांची दहशत
पर्वती : सरिता विद्यालयाकडून पर्वती गावात जाणाऱ्या रस्त्यावर तेथील ओढ्याच्या काठावर अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर असून सकाळच्या वेळी ही कुत्री वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडतात. कधीकधी ही कुत्री वाहन चालकाच्या पायांचा चावा घेतात. कुत्री पाठीमागे धावत येत असल्यामुळे वाहन चालक तोल जाऊन जखमीही होतात. कुत्र्यांची दहशत वाढत असून महानगरपालिकेने तातडीने कुत्री पकडून नेण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली आहे.
-विनायक बोरकर
वार्षिक स्नेहसंम्मेलन
घोरपडे पेठ : पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित घोरपडे पेठ येथील महर्षी आण्णासाहेब शिंदे मनपा शाळा क्रं.25 जी इंग्रजी माध्यम शाळेत वार्षिक स्नेहसंम्मेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रंसगी नगरसेवक अजयभाऊ खेडकर, आरतीताई कोंढरे तसेच योग आंनद ग्रुप परिवाराचे रविंद्र गांधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर तोकापुरे, मुख्याध्यापक नितीन पोटे, उपशिक्षक बंडोपंत नजनव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन बंडोपंत नजन यांनी केले. तर आभार संतोष गवळी यांनी मानले.
-रवींद्र गांधी